Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जुलै, २०२३

चुकीचा तननाशकाच्या फवारणीमुळे कापसाच्या पिकाचे मोट्या प्रमाणात नुकसान,वाडी येथील शेतकरी अडचणीत वाढ....



धुळे - कापसाच्या पिकावरील तणनाशक नष्ट करण्यासाठी शेतात करण्यात आलेल्या फवारणीमुळे आठ एकर क्षेत्रातील शेतकऱ्याच्या कापसा च्या पिकाचे नुकसान झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील पुनर्वसन केलेल्या वाडी गावात घडला आहे. या फवारणीमुळे कापसाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतकऱ्याचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. आधीच वरून राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला असतानाच रेट्रो पॅराकोट डिक्लोराईड हे तणनाशक फवारणी केल्याने शेतकरी चे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावत नुकसान झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतीच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या लामकानी येथील देवेंद्र फर्टीलायजर्स या दुकान मालकाविरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याची मागणी वाडी येथील नुकसानग्रस्त ललित भिमसिंग गिरासे या शेतकऱ्याने केली आहे. तसेच संबंधितांविरोधात कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील शेतकऱ्याने दिला आहे.
दोन दिवसांपूर्वीच पुनर्वसन झालेल्या वाडी येथील ललित भीमसिंग गिरासे या शेतकऱ्याने कापसाच्या शेतातील तणनाशक नष्ट करण्यासाठी लामकानीच्या देवेंद्र फर्टीलायझर्स या दुकानातून रेट्रो पॅराकॉट डिकलोराईड या कंपनीचे तणनाशक आठ एकर क्षेत्रात फवारणी करण्यात आली. मात्र फवारणी केल्यानंतर शेतकऱ्याच्या आठ एकर क्षेत्रातील 80 क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तणनाशक फवारणी केल्याने कापसाचे पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे संबंधित खतविक्रेत्या दुकानदाराची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे यावा.व झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे.
संबंधित शेतकऱ्याने खरेदी केलेले तणनाशक चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यानेच शेतकऱ्या च्या कापसाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती देवेंद्र फर्टीलायझर्स च्या ठानसिंग राऊळ यांनी दिली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध