Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जुलै, २०२३

शिरपूर तालुक्यातील भॊई समाज आदर्श नगर महिला विकास मंडळाचा नाविण्यपुर्ण उपक्रम...! आपल्या दैनंदिन बचतीतून काटकसर करुन नगरपालिकेस लोकार्पण केली शवपेटी...!




शिरपूर प्रतिनिधी :- आजच्या युगात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काही तरी लाभ कसा मिळेल.अश्याच प्रयत्नात प्रत्येक जन असतो. मात्र अश्या परिस्थितित देखील शिरपूर तालुक्यातील भोई समाजातील माता-बघीणी यांनी सर्वस्तरावरील समाज बांधवांना उपयोगी पडेल अशी एक संकल्पना पुर्वीपासून मनात बांधून रोजच्या दैनंदिन खर्चातून काटकसर करुन त्याची बचत केली व त्या बचतीच्या रक्कमेतून नविन तंत्रज्ञान असलेली आधुनिक पध्दतीची शवपेटी खरेदी करुन शिरपूर वरवाडे नगरपालिकेस संपुर्त केली.शवपेटी लोकार्पण सोहळा आज दि.27 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता करण्यात आला. 


यावेळेस भ्रमणध्वनीवरुन शिरपूर शहराचे विकासरत्न व माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार सो.अमरीशभाई पटेल,शिरपूर विधानसभेचे आमदार काशिरामदादा पावरा, माजी नगराध्यक्ष सौ.जयश्रीबेन पटेल व माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी या भोई समाजाच्या महिला उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.सदर लोकार्पण सोहळ्यास माजी नगरअध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरपालीका मुख्य अधिकारी तुषारजी नेरकर, प्रशासकिय अधिकारी संजय हासवाणी,अभिलेखापाल भाईदास भोई, सेवानिवृत्त अभियंता माधवराव पाटील,उपस्थित असलेले माहिला मंडळ ज्याच्या पुढाकाराने व दृढ निश्चयाने हा नाविण्यपुर्ण व समाजातील सर्व स्तरावरील कार्यकर्ते मंडळीला एक आदर्श उभा केला अश्या महिला मंडळाचे सर्वच कार्यकर्ते हजर होते. 


या लोकार्पण सोहळा प्रसंगी मा. प्रभाकररावजी चव्हाण यांनी महिलांनी राबविलेल्या उपक्रमाबाबत तोंडभरुन कौतुक केले.शिरपूर शहरात याप्रकारचा उपक्रम आजपर्यत कोणत्याही समाजाने अथवा महिला मंडळाने राबविलेला नाही.भोई समाजाच्या महिला याबाबत अग्रेसर आहेत. यावेळी उपस्थित भोई समाजाच्या महिला मंडळाती महिलापदाधिकारी सोनीबाई दगा भोई,गंगाबाई दुर्लभ भोई, पुप्पाबाई बन्सीलाल भोई,सुमनबाई किसन भोई,आशाबाई छगन भोई, जिजाबाई दुर्लभ भोई,कस्तुरीबाई बन्सीलाल भोई, कमलबाई प्रभाकर शिवदे,निर्मलाबाई अरुण भोई, सुरेखा अभिमन भोई,रंजना वासुदेव भोई, ललिताबाई मुलचंद भोई, वैशाली दिलीप भोई, नर्मदाबाई ईश्वर भोई, भिकुबाई मकडू भोई,अनुबाई दत्तू बडगुजर,मनुबाई हरी भोई,वंदना धनराज भोई,सुमनबाई प्रल्हाद भोई, हिरा विशाल भोई,सखुबाई झिंगा भोई, प्रमिला सुभाष भोई, प्रमिला तुकाराम भोई,आलकाबाई योगेश भोई, मनिषा प्रविण मोरे, ज्योती अशोक मोरे, शोभा अरुण मोरे, वैशाली शरद मोरे. शृंभागी राहूल मोरे, लताबाई विशाल भोई, सुनंदा सुभाष सोनवणे, सुरेखा भरत ढोले, ललिता हेमंत भोई, जागृती नितीन भोई, करुणा रविंद्र वाडीले, प्रतिभा राजेश्वर शिवदे, जयश्री राजेंद्र सोनवणे, रिता भोजराज ढोले, सुमनबाई प्रल्हाद ढोले,सुमनबाई धनराज सोनवणे,ज्योतीबाई नितिन सोनवणे,विमलबाई नाना सोनवणे,
कसाबाई धुडकू भोई, लिलाबाई सखाराम सोनवणे, नबाबाई ईश्वर सोनवणे,लताबाई हिरालाल सोनवणे, संगिता अमोल सोनवणे,रेखा गोकुळ भोई,इत्यादी महिला मंडळ उपस्थित होते.

तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोई समाजाचे सी.एम.भोई सर,गुलाब भोई,भाईदास भोई,सुभाष भोई,संतोष भोई,डॉ पितांबर डिगोरे,यशवंत निकवाडे,आर.एम.वाडीले,संजय नंदुरबारे,जगदिश मोर्रे, मोहन ढोले,
भोजराज भोई,रविंद्र सोनवणे,संदिप वाडीले,दिपक ढोले, मोहन ढोले,सचिन ढोले,डॉ.राजेश्वर साठे,प्रशांत ढोले,
भूषण मोरे,सुदाम मोरे,नितीन भोई, सचिन ढोले,उमेश मोरे, गणेश मोरे, दिलीप ढोले,राधेश्याम सोनवणे यांनी प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध