Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी.एम.बायोटेकचा विविध सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर व जीवामृत तसेच दशपर्णी अर्क भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी ठरत आहेत
पी.एम.बायोटेकचा विविध सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर व जीवामृत तसेच दशपर्णी अर्क भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी ठरत आहेत
पूर्वी ऊस पिकाला खते देत असताना फक्त रासायनिक खते देत होतो.नंतरच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्या साठी 10 किलोची बॅग वापरू लागलो.त्यामध्ये झिंक ,फेरस,
मैग्नेशियम, मैग्निज,बोरॉन,कॉपर,मॉलीबडेनम हे सर्व 10 किलोच्या बॅग मध्ये मिळायचे.जमिनी मध्ये ताकत होती त्यामुळे 10 किलो च्या बॅग मधून त्याची गरज भागायची. परंतु त्यानंतर सातत्याने न थांबता ऊस काढून ऊस करत गेल्यामुळे अलीकडील काळात 10 किलो च्या बॅगमधील सूक्ष्मअन्नद्रवे ऊस पिकाला कमी पडू लागले.त्यामुळे खास ऊस पिकासाठी बनवलेले बायो गोल्ड प्लेस एकरी पाच लिटर द्यायला कंपनीने सुरुवात केली आहे त्यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.तसेच भाजीपाला पिकातील व्हायरल रोगासायही जैविक स्लरी,जीवामृत तसेच दशपर्णी अर्क चा वापर करणे गरजेचे आहे तेव्हापासून सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही.व कुठलाही रोग पिकावर येण्यास धजत नाही सुक्ष्मअन्नद्रवे शेणखता मधून दिल्याने चिलेटेड स्वरूप प्राप्त होऊन ते पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात.त्यासाठी एकरी 250 किलो चाळून घेतलेले शेणखत किंवा कोणत्याही सेंद्रिय खतामधून दिल्यास सुंदर परिणाम मिळतात.
चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्मअन्नद्रवे देखील वापरू शकता.विशेषत चुनखडीयुक्त जमिनी मध्ये,भारी निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर परिणामकारक ठरतात.चिलेशन केल्यामुळे पिकांना सहज व जलदरित्या उपलब्ध होते व जमिनीत कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. चिलेटस ही पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असतात किंवा पूर्णपणे विरघळतात. चिलेट स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने वापराचे प्रमाण कमी लागते.
सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर करत असताना शक्यतो रासायनिक खता ऐवजी पी एम बायोटेक काला हे खत एकरी 100 किलो द्यावे .दोन्ही मध्ये किमान 15 दिवसाचे अंतर ठेवा. पर्याय नसल्यास काकरीच्या एका बाजूला रासायनिक खत व दुसऱ्या बाजूला सुक्ष्मअन्नद्रवे टाका. विशेषतः खोडव्याला सुरुवातीला रासायनिक खताबरोबर सूक्ष्मअन्नद्रवे देण्याची गरज भासते.अशा कंडिशनला एका बाजूला रासायनिक खते व दुसऱ्या बाजूला सूक्ष्मअन्नद्रवे टाकावे. परंतु काही शेतकरी रासायनिक खता ऐवजी पी एम बायोटेकचे एन पी के व बायो पोटॅश,बायो सम्राट इत्यादी प्रकारची सेंद्रिय खते व सूक्ष्मअन्नद्रव्ये मिसळून टाकतात,ते सर्व टाकावे .
एकरी खालील प्रमाणे सूक्ष्मअन्नद्रव्ये द्या.
पी एम बायोटेकचे झिंक 10 किलो मॅग्नेशियमसल्फेट :-10 किलो
फेरस सल्फेट:-10 किलो
मैग्नेशियम सल्फेट:-25 किलो
मैग्निज सल्फेट :-5किलो
बोरॉन :-3किलो
गंधक :- 10किलो
सिलिकॉन पावडर:- 80 किलो
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा