Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जुलै, २०२३

अहो साहेब,आमच्याकडे पण लक्ष द्या ! शिरपूर शहरातील वाल्मिक नगर परिसराकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष !



शिरपूर प्रतिनिधी : वाल्मिक नगर येथील समाज भवन रस्ता व गटार यांचे काम अजून अपूर्णच असून मुदत संपल्यामुळे नगर पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी प्रभागातील विविध समस्यांसाठी सर्वसामान्य जनता मात्र माजी नगरसेवकाकडे व सामाजिक कार्यकर्त्याकडे धाव घेत आहे.माजी नगरसेवक नागरिकांच्या तक्रारी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मांडतात. मात्र अधिकान्यांकडून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे नागरीकांच्या समस्या आता सोडवणार तरी कोण,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासकीय राजवटीमुळे अप्रत्यक्षरित्या माजी नगरसेवक आणि नागरिकांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. मुख्याधिकारी यांचा वतीने निवेदनाची प्रत न.पा.चे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी स्विकारले.आहे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, परीसरातील राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे ते खालील प्रमाणे. 


१) वाल्मिक नगर परिसरात महर्षी वाल्मिकी भवनचे काम हे गेले ५ वर्षांपासुन सुरू आहे.तरी ते आज पर्यंत पूर्ण झालेले नाही.तरी भवनचे जीन्याचे टप्पेची स्टाईल, कलर, वाटर प्रुफ भवन जवळील रस्ता असे भरपुर बाकी आहेत.ती पुर्ण करण्यात यावी.२) वाल्मीक नगर परीसरातील रस्ते २ वर्ष पुर्वी करण्यात आले होते, तरी त्यात १ गल्ली व २ बोळ बाकी आहेत.तरी ते आज पर्यंत करण्यात आलेले नाही.ते रस्ते लवकरात लवकर करण्यात यावीत.

३) वाल्मीक नगर परीसरातील नाल्याचे काम आताच करण्यात आले तरी ते काम चालू असतांना त्या नाल्यामध्ये २० वर्ष पूर्व एक बॉल बांधण्यात आला होता.हे काम करत असतांना त्याच वॉलचा पुढे नवीन वॉल बांधण्यात आला तरी तो जुना बॉल काहीही कामाचा नाही.तरी तोडुन नवीन करण्यात यावा व त्याची उंची पण वाढवण्यात यावी व पुलाच्या एका साईडला खालील बाजुस कॉक्रीट करण्यात आले आहे.व एक बाजुला बाकी आहे ते पण करण्यात यावी.

४) नाल्याचे नवीन काम केल्यामुळे नाल्याच्या बाजुला असलेली आदिवासी वस्ती मध्ये नाल्याचे पाणी साचत आहे.त्यामुळे तेथील आदिवासी लोकांना फार त्रास होत आहे.तरी आदिवासी वस्तीच्या दोन गल्ली मध्ये भराय करून दोन फुट वरती रस्ता करण्यात यावा.हे काम तात्काळ करण्यात यावे.

५) वाल्मिक नगर परीसराच्या बाजुला असलेली सोसायटी जिनींगमुळे दरवर्षी वाल्मिक नगर परीसरातील भरपूर लोक व लहान मुले आजारी पडत असतात हे २० ते २५ वर्षे पासून असच चालु आहे.तरी त्या जिनींग मध्ये
भरपुर घाणीचे साम्राज्य आहे.तरी त्या परीसराची संपूर्ण साफ सफाई करण्यात यावी व त्या जागेच्या परिसरात वॉलकंपाऊंड करून बंदोबस्त करण्यात यावा.६) वाल्मीक नगर व किस्मत नगर दोन्हीचा मध्ये असलेली बोळ हा करवंद नाका से स्वामी रेडियम रस्त्याचे काम नवीन झाल्यामुळे त्या रस्त्याची उंची वाढल्यामुळे ही बोळ एक ते दिड फुट खाली झाली आहे त्यामुळे त्याठिक पावसाळ्याचे पाणी साचत आहे व ते पाणी किस्मत नगर परिसरातील घरांमध्ये जात आहे.तरी तेथे भराय करून तात्काळ काँक्रीटीकरण करण्यात यावे.

(७) हिन्दुचे आराध्य देवत महादेव व बजरंग बली चे मंदीर रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळे रोज त्या मंदिराचे दर्शनसाठी वाल्मिक नगर मधील रहिवासी जात असतात.रस्ता क्रॉस करीत असतांना भक्ताचा अपघात होवू शक तो त्या कारणाने करवंद नाका ते स्वामी रेडियम हा रस्ता नवीन झाल्याने येण्याच्या जाण्याच्या वाहनाचा स्पीड नेहमी जास्त असल्यामुळे वाल्मीक नगर समोर गतीरोधक असणे अत्यंत आवश्यक आहेत, तरी रस्त्यात दोन्ही बाजुस गतीरोधक टाकण्यात यावा हि विनंती.

तरी वरील सर्व समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावी हि विनंती.वरील कामे करण्यात आली नाही,तर मग येत्या १० दिवसात वाल्मिक नगर परिसरातील जनतेकडून कडून नगर पालीकेवर मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, याची नोंद घेवून याची सर्वस्वी जबाबादारी शिरपुर वरवाडे नगर परिषद शिरपुर यांची राहिल.असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

निवेदन देतेवेळी विनायक कोळी, संजय कोळी,सोमनाथ धनगर,संतोष भोई, बाबा गोसावी,मोहन ईशी,मोहन कोळी, बापु वाघ,भाऊसाहेब कोळी,मनोज कोळी,राधेश्याम चौधरी,रणजित कोळी, शैलेश कोळी,नाना कोळी,विजु कोळी,हिम्मत कोळी,विक्की कोळी, बापु कोळी,अशोक कोळी,जितेंद्र कोळी,जितु कोळी,मुकेश कोळी, मयुर धनगर,संदिप कोळी,ज्ञानेश्वर कोळी, योगेश भोई,राहूल कोळी,महेश कोळी, नितीन धनगर, सुदर्शन गोसावी,संतोष कोळी,प्रशांत गोसावी, गणेश माळी, दिपक माळी,दिपक कोळी,योगेश कोळी,पिंटू कोळी,आबा कोळी,प्रकाश सोनवणे,घनश्याम हटकर दिनु माइने, मुकेश शिंदे,दिप सुतार,आकाश चौधरी, प्रशांत गोसावी, मयुर धनगर आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध