Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

तोंदे विकास सोसायटीचे मारखाऊ फेर लेखापरीक्षक यांचा अजब प्रकार...!



शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तोंदे विकास सेवा सहकारी सोसायटीच्या फेर लेखापरीक्षकांचा प्रताप व घडलेले इतिवृत्त याबाबत आपण बरेच काही या पुर्वीच्या लेखात वाचले आहेत सदर लेखापरीक्षकाकडे १/४/२०१० ते ३१/३/२०१८ या कालावधीचे फेरलेखापरिक्षण करण्याबाबतचा आदेश त्यांना दिलेला आहे.

सदर संस्थेच्या फेरलेखापरिक्षणासाठी या बहाद्दराणे आपला खिसा कसा गरम  करता येईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अजब अशी शक्कल वापरण्याचा प्रयत्न देखील केले.यात त्यांच्याकडे फ़ेरलेखापरीक्षणासाठी सोपविलेल्या कालावधीतील वैधानिक लेखापरिक्षण केलेल्या एक-दोन प्रामाणित लेखापक्षकांवर दबाव देखील निर्माण करुन.....ची मागणी केली होती 

“आभी तो टायटल है,पुरी फ़िल्म बाकी है”अश्या अवेश्यात तो त्यांना सांगत होता.इतकेच नव्हे तर शिरपूर येथिल एस बी नंदुरबारे प्रमाणित लेखापरीक्षक,यांना तुमच्या बाजूने व बॅकेच्या विरोधात निर्णय देतो.मग काही तडजोड होईल का ? अनेरची ताजे मासे खूपच प्रसिध्द आहेत.आम्हाला जेवन देऊन खूश करुन टाक, काहीतरी टोकन दे.अश्याप्रकारची मागणी देखील केली होती.यावर संबंधीत लेखापरीक्षकाने त्यांना सांगितले की “मी कुणालाच पैसे देत नाही.व केवळ त्यामुळेच माझ्यावर बदला घेण्याच्या हव्याश्यापोटी हे कट कारस्थान करुन व वरिष्ठाकडे खोटे-नाटे सांगून ही कार्यवाही केलेली आहे, व मी त्यामुळे मे.कोर्टात त्या निर्णयाविरुध्द अपिलात गेलो आहे.”   
          
इतकेच नव्हे तर या संस्थेचे संबंधित कालावधीमधील प्रामाणिक लेखापरीक्षक एस बी नंदुरबारे यांनी सादर केलेल्या प्रशासकीय अहवालाची देखील मागणी केली होती.मात्र तसे मला तुम्ही लेखी पत्र द्या असे सांगितले असता मी तुझ्याच फ़ायद्यासाठी व माझावेळ वाचविण्यासाठी तो अहवाल मागतो आहे.असे सांगितले.त्या अहवलातील तुझी सही शिक्का आहे तेथे कागद चिटवून देतो व वरचे पान बदलवून त्यावरच माझा सही शिक्का व कव्हरिंग लेटर जोडून फ़ेर लेखापरीक्षणाचा आहवाल सादर करतो.

अश्या प्रकारचे अमीष देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.मात्र ते अश्या अमिषाला बळी पडणारी व्यक्ती नसल्याने आता तुझी माझ्याशी गाट आहे,मग बघ काय करतो ते.अशी धमकी देऊन चालते झाले.अश्या ह्या मारखाऊ फेरलेखापरीक्षकांने अजब शक्कल वापरुन आपला खिसा गरम करण्याचा गजब प्रयत्न केला होता.अशी माहिती आमच्या प्रतिनिधीजवळ नंदुरबारे यांनी दिली आहे.

वाचा सविस्तर पुढील अंकात - तोंदे विकास सोसायटीच्या फेर लेखापरीक्षणा मागील सत्यता...!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध