Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका पोलिसांची दोन दिवसांत परत मोठी कारवाई...! शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संशयिताला केले जेरबंद....!
शिरपूर तालुका पोलिसांची दोन दिवसांत परत मोठी कारवाई...! शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील संशयिताला केले जेरबंद....!
शिरपूर प्रतिनिधी:- दिनांक २२/०७/२०२३ रोजी सपोनि श्री जयेश खलाणे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उमर्टी (मध्यप्रदेश राज्य ) गावातून भोईटी रस्त्याने शिरपुर कडे एक लाल रंगाचे फुल टी-शर्ट परीधान केलेला इसम हा चारचाकी वाहनात गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन जात आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून सपोनि जयेश खलाणे यांनी पी.एस. आय/संदिप पाटील,पी.एस.आय कृष्णा पाटील,पोहेकॉ ११७५ सागर ठाकूर,
पो.कॉ/८४ संतोष पाटील,पो.कॉ १६७७ योगेश भोरे,पो.कॉ ९१८ रोहिदास पावरा व चालक पो.कॉ/१७ इसरार फारूकी असे पथक तयार करून तात्काळ बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी रवाना केले.
बातमी प्रमाणे भाईटी गावाजवळ जावून तेथे सापळा लावण्यात आला त्यानंतर काही वेळातच समोरून शिरपुर कडे जाणारी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी स्विफ्ट डिझायर गाडी क्र MH 12 QG 0472 ही येताना दिसती सदर वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा दिला परंतु ते वाहन थाबले नाही.त्यानंतर पथकातील अमंलदारांनी सदर वाहनाचा पाठलाग करून पुढे काही अंतरावर जावून वाहनास अडविण्यात आले व सदर वाहनातील लाल फुल टी-शर्ट घातलेल्या वाहन चालकास पोसई संदिप पाटील यांनी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सईद आस मोहम्मद सय्यद वय ३१ वर्ष रा. श्रीरामपुर जि.अहमदनगर असे सांगितले तसेच त्याची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्यात खालील मुद्देमाल मिळून आला.
१) १,३५००० /- रुपये किमतीचे ३ गावठी बनावटीचे पिस्टल (मॅगझिन सह )
२ ) ८००० /- रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुस ३) ५,00,000/- रुपये किमतीची एक सिफ्ट डिसायर कार
एकुण ६,४३,००० /- रूपये किमंतीचा मुद्देमाल
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किमंतीचे गावठी बनावटीचे पिस्टल ( मॅगझिन सह व जिवंत काडतुस मिळून आल्याने सदर आरोपीतां विरुध्द शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात दि.२२/०७/२०२३ रोजी पो.कॉ ९१८ रोहिदास पावरा यांनी सरकार तर्फ फिर्याद दिल्याने गु.र.न CCTNS क्र १६९ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ०३ / २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लधंन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी.एस.आय सुनिल वसावे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड सो,मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी सपोनि जयेश खलाणे पी.एस.आय ,संदिप पाटील, पी.एस.आय कृष्णा पाटील,पोहेकॉ / ११७५ सागर ठाकूर,पो.कॉ / ८४ संतोष पाटील,पो.कॉ / १६७७ योगेश मोरे, पो.कॉ / ९१८ रोहिदास पावरा व चालक पो.कॉ / १७ इसरार फारूकी यांनी केलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा