Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जुलै, २०२३

शिरपूर शहर पोलिस स्टेशनची महिला सिंघम छाया पाटील यांची कॅफे वर धडक कारवाई...!



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला सिंघम पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांच्या सह पथकाने शहरातील करवंद नाका परिसरातील सॉलीड कॅफेत धाड टाकत कारवाई केली.यावेळी कॅफेतील दोन मुला मुलीच्या जोडप्यांना ताब्यात घेऊन समज देत सोडण्यात आले तर कॅफे मालक वर कारवाई करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी अतुल संजय निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की दि 12 रोजी करवंद नाका येथील सॉलीड कॅफे येथे कॅफे मालक राहुल सुरेश कोळी वय 28 वर्षे हा शाळा व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीना परिसरातील तरुण तरुणी यांना कॉफी पिन्याच्या निमीत्ताने खाजगी जागेत कॅफे मध्ये कॅफे मालक अधिक पैसे आकारून खाजगी जागा उपलब्ध करुन देवून अश्या खाजगी जागेत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची परवानगी देतात व त्यामुळे परिसरातील नागरीकांना त्रास होवुन उपद्रव करीत आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक ए.एस.
आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोको गांगुर्डे,मपोना पाटील,मपोका खैरनार,मपोकों 77 पावरा अश्यांना दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास अचानक सॉलीड कॅफे येथे पाहणी केली असता तेथे चौकशी दरम्यान एका खाजगी जागेवर मुलगा व मुलगी असे दोन जोडपे आढळुन आले असुन त्यांना चौकशी करून सोडुन देण्यात आले आहे. 

अधिकचे पैसे आकारून अश्या जोडप्यांना खाजगी जागा उपलब्ध करुन देवून त्यांना खाजगी जागेत आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्याची परवानगी दिली म्हणुन माझी सॉलीड 
कॅफे चालक राहुल सुरेश कोळी 28 वर्षे व्यवसाय कॅफे चालक रा.वरवाडे ता शिरपुर जि धुळे याचेविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध