Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जुलै, २०२३

एक सही शेतकरी हितासाठी...! मोहिमे अंतर्गत शेतक-यांनी कथन केलेले किस्से...! (भाग- दोन)



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील शेतक-याच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा प्रकरणास योग्य व उचित न्याय मिळवून देण्यासाठी  शेतकरी बांधवानी सुरु केलेल्या “एक सही शेतकरी हितासाठी” या मोहीमेस चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असून ठिक-ठिकाणी शेतक-यांना गोळा करुन मोहिमे मागील खरे सत्य समजवून देण्यात येत आहे.
यातच काही ठिकाणी त्यांना ऐकावयास मिळालेले किस्से अत्यंत बोलक्या व शेतक-यांच्याच भाषेत कथन करण्यात येत आहे.  

“ हाई तर काहीच नही से भाऊ, आमणा गांवमा मरेलेसे बी कर्ज भेटस आणि ते पण स्वर्गात जाईसन मरेल सभासदासले पैसा देई येतस, ते पण मना मरेल बापलेच स्वर्गामन  जाईसन कर्जाना पैसा देयल से ! मग आते वसुलीले स्वर्गमन कोणले धाडतस तेच देखाण से” तोच जवळच उभा असलेला एक शेतकरी कथन करतो की,“आरे भाऊ मनाकडे क्षेत्रच नाही तरीपण मना नाववर पिक कर्ज देयल से ! ”अश्या अजून दुस-या एका आदिवसी शेतक-याने सांगितली आहे. 

“मना बापले जाईसन एक तप होईगय तरी मी मना बापनाच नाववर कर्ज भेटस ! काढालेपण कोठे जाणा पडस नाही.मन बॅकन कार्ड बँक वाला सनी भाऊसाहेब कडेच ठेवायला सांगेल से. आणि भाऊसाहेब पण तथाईन पैसा लई येस  माले कठेच जावानी गरज पडत नाही !” अश्याप्रकारचे किस्से ऐकायला मिळाल्यानंतर आता शेतक-यांच्या बॅकेतील निरनिरळ्या किस्स्यामधून अजून बरेच काही चौकशी मागण्या इतपत मुद्दे अभ्यासू शेतक-यांच्या लक्षात येऊ लागले आहेत.  

(अजून काही किस्से ...! वाचा सविस्तर पुढील अंकात )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध