Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जुलै, २०२३

निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,बॉर्डर चेक पॉइंट,हाडाखेड विभागाची धडक कारवाई...!



शिरपूर प्रतिनिधी:- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,बॉर्डर चेक पॉइंट,
हाडाखेड ता.शिरपूर,जि.धुळे या विभागाचे मा.आयुक्त डॉ.श्री. विजय सूर्यवंशी साहेब, (भा.प्र.से) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई मा. श्री.सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार हॉटेल सुवर्णनगरी च्या बाजूला सोनगीर चिमठाने रोड,सोनगीर ता.जि.धुळे या ठिकाणी तात्काळ जावून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर ठिकाणी वाहन क्र MH १५ JC ०४६९ यामध्ये परराज्यातील रॉयल ब्लू विस्की ७२० बॉक्स व अँड्रीईल क्लासिक विस्की १० बॉक्स असा एकूण ७५० मिली क्षमतेचे ७३० बॉक्स (८७६० बॉटल ) विदेशी मद्याचे मिळून आले. मा.डॉ.श्री.बी.एच.तडवी साहेब विभागीय उपायुक्त,राज्य उत्पादन शुल्क,नाशिक विभाग,नाशिक,मा.श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,धुळे यांचे मार्गदर्शना खाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका,हाडाखेड, ता. शिरपूर धुळे यांनी दिनांक १४.०७.२०२३ रोजी गस्तीवर असतांना हॉटेल सुवर्णनगरी च्या बाजूला सोनगीर चिमठाने रोड, सोनगीर ता.जि.धुळे संशयित वाहन क्र MH १५ JC०४६९ वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये परराज्यात विक्री साठी असलेले विदेशी मद्य चे एकूण ७३० बॉक्स मिळून आले त्याची मुद्देमाल किमंत ४४,००,०००/- व वाहन किमंत १५०००००/- असा एकूण एकूण ५९,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार, वय 25 वर्ष रा मु.पो तंबोळे ता.माहोळ जि.सोलापूर व त्याचा साथीदार ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे वय 20 वर्ष रा.मु.पो पोखारापुर ता. मोहोळ जि. सोलापुर यांना जागीच अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई निरीक्षक श्री ए.पी. मते,दुय्यम निरीक्षक श्री.एस.ए. चव्हाण,पी.एस.धाईजे राज्य उत्पादन शुल्क,सीमा तपासणी नाका,हाडाखेड, ता.शिरपूर,धुळे दुय्यम निरीक्षक बी. एस.चोथवे साक्री दुय्यम निरीक्षक श्री.ए.सी मानकर,श्री.एस.एस.शिंदे,श्री एस.एस.आवटे,भरारी पथक धुळे.स.दु.नि श्री.एस.एस.गोवेकर तसेच जवान श्री.प्रशांत बोरसे,गोरख पाटील,के.एम.गोसावी,केतन जाधव, डी.टी.पावरा,एस.एच.देवरे,एम.एस धुळेकर,हेमंत पाटील तसेच वाहन चालक श्री.विजय नाहीदे निलेश मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग,धुळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून सदर गुन्ह्याची फिर्याद श्री प्रशांत बोरसे जवान यांनी दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास श्री.एस.ए.चव्हाण,दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका, हाडाखेड,ता.शिरपूर,जि. धुळे, हे करीत आहेत.

तरी जनतेस आवाहन करण्यात येते की,अवैधमद्य निर्मिती,वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार आल्यास या विभागाचा टोल फ्री क्र.180023399999 व WHATSAAP नं 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02562 297484 या क्रमांकावर संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध