Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ जुलै, २०२३

धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतील गैरव्यवहार उघड ! कोटीचा गैरव्यवहार व लाखोची सावकारी !



शिरपूर प्रतिनिधी:-धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. धुळे ही दोन जिल्ह्यांची शेतक-यांच्या बॅकेत शेतक-यांच्या नावाचा गैरफ़ायदा घेत त्यांच्या नावावर बनावट सह्या व दस्त तयार करुन मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार बॅकेच्याच कर्मचा-यांनी केलेले आहेत.  एकीकडे ही बॅक नविन व वंचित सभासदांना कर्ज देण्यास पुरेशा निधी बॅकेकडे उपलब्ध नसल्याचे म्हणत आहे.दुसरीकडे याच बॅकेचे कर्मचारी कोटीने गैरव्यवहार करत आहेत.  असे असतांना या गैरव्यवहाराची संबंधीत बॅकेचे लेखापरीक्षक यांनी कसा काय कानाडोळा करुन सोडाला ?आणि त्यांना जर हा गैरव्यवहार सापडाला असेल तर मग आजपावतो संबंधीत लेखापरीक्षकाने गुन्हा का दाखल केला नाही ? यामागचे नेमचे गुपित काय ? नेमके पाणी कुठे मुरत आहे ? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशिर कारवाई होणे अपेक्षित आहे.

बॅकेने काढलेल्या जाहिर नोटीसीनुसार धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.धुळे या बॅकेच्या तळोदा शाखेतील 1,88,98,140/- रक्कमेच्या गैरव्यवहाराबाबतची श्री. पंढरीनाथ पुंडलिक मराठे (तळोदा शाखा तपासणीस दिनांक 30/06/2019 रोजी सेवानिवृत्त) व श्री.देविदास पुंजरू पाटील (तळोदा शाखा शिपाई दिनांक 30/06/2022 रोजी सेवानिवृत्त) या दोन्ही कर्मचारींनी इतर 8 सहका-यांच्या संगनमताने तळोदा शाखेशी सलग्न असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी/ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या 92 सभासदांच्या नावावर 1,88,98,140/- इतक्या रक्कमेचा गैरव्यवहार सदर कर्मचारी सेवाकालावधीत असताना केलेला असल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे.  मग एक कर्मचारी हा सन 2019-2020 व एक कर्मचारी 2022-23 मध्ये सेवानिवृत्त झालेला आहे. 


याचाच अर्थ हा गैरव्यवहार सन 2019-2020 पुर्वीच झालेला असावा. मग बॅकेचे सन 2019-2020 ते 2022-2023 या कालावधीचे लेखापरीक्षण झालेले नाही काय ? झालेले असेल तर बॅकेच्याच लेखापरीक्षकाने गुन्हा का दाखल केलेला नाही ? या लेखापरीक्षकांनी घडलेल्या गैरव्यवहाराची माहिती बॅकेच्या मे.नोंदणी अधिकारी यांना का दिली नाही ? दिलेली असल्यास मे. नोंदणी अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यास का परवानगी अथवा आदेशीत केले नाही ? ज्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या नावाने हा गैरव्यवहार केला आहे त्या संस्थेचे लेखापरीक्षकाने काय तपासले ? त्यांनी का गुन्हा दाखल केला नाही ? त्यावेळीस नेमका त्या संस्थांचे मे. नोंदणी अधिका-याचा चार्ज कोणाकडे होता ? त्यांनी काय केले ? असे कितीतरी कायदेशिर प्रश्न उभे राहतात.मग यामागील सत्य जाणुन घेणे खूप महत्वाचे आहे.आमच्या वृत्तसेवे मार्फ़त त्याचा शोध घेणे सुरु आहे.

अश्यातच चालू मध्ये शिरपूर तालुक्यात बचत गट घोंटाळा प्रकरण खूपच जोमाने गाजत आहे.प्राप्त माहिती नुसार बॅकेच्या एका....गल वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक शाखाधिकारी यांच्यावर दबाब निर्माण करुन व बचत गट तपासणीस.....रसे यांच्या मदतीने त्यातच एका सराईत विनापरवाना सावकारी करणा-या.....वणे बॅक अधिकारीला सोबतीला घेऊन वि.का.से.सोसायटीच्या सभासदांच्या नावाने कर्जाचा भरणा केलेला आहे. व तात्काळ याच सभासदांच्या कर्ज मागणी याद्या मंजूर करुन शेकडा 3 ते 5 टक्के मासीक दराने व्याज रक्कम सभासदांकडून/ व त्याच्या कर्ज खात्याच्या एटीएम द्वारे काढून कर्जाचे नुतनीकरण व्यवहार केलेले आहेत.  बँकेतील आपल्या पदाचा गैरवापर करुन खाजगी सावकारी करणारे व शेतकऱ्यांना लुटणारे,बॅकेतील सावकारांनी बॅक कर्मचा-यांच्या....वणे चा भाऊ,....टील यांची बायको व...चे मित्र....ले  या त्रयस्त व्यक्ती बॅक कर्मचारी.....राथी हे बचत गटाचे सभासद नसतांना देखील त्यांना कर्ज देण्यासाठी बचत गटातून वैयक्तीक सावकारीसाठी पैश्याचा वापर केलेला आहे.

खरे पाहता बॅकेने नियुक्त केलेल्या पदाचा गैरवापर करुन मागील 6-7 वर्षापासून सराईतपणे असा व्यवहार सुरु असल्याचे बॅकेच्या काही दुखी आत्मांनी आम्हास माहिती दिली आहे.   मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणून या बॅक अधिका-यांने आपला विनापरवाना सावकारी व्यवसाय वाढीसाठी आपल्या अधिकाराचा व पदाचा पुरेपुर गैरवापर करत आपल्याच अख्तारीत असलेल्या 3-4 संस्थेच्या... /..../...../..... या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या सचिवास शेकडा 1 टक्केचे अमिश तोंडाला लावून आपले काम सोयीस्कर केले आहे.इतकेच नव्हे तर शाखेतील.....स्कर नामक प्लॉटींगचा व्यवसाय करणा-या व्यक्तीचे खाते तपासले तर या खात्यावर झालेले उचल व भरणा स्लिप वरील हस्ताक्षर हे याच सावकारी करणा-या....वणे या बॅक अधिका-याचे असल्याचे दिसून येईल.ज्या-ज्यावेळी रक्कमा या खात्यातून विड्राल झाल्यात त्या-त्या वेळी संस्थेच्या सभासदांचा भरणा आलेला आहे.व जसे-जसे कर्ज उचल झाली त्या-त्या वेळी या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे.तसेच या रक्कमा एटीएम मार्फ़त काढतांनाचा सीसीटीव्ही फ़ुटेज घेतल्यास अजून खूपच काही माहिती पुढे येऊ शकते.

यापुर्वीच्या घटनाचा आढावा घेतल्यास शिरपूर तालुक्यातील तोंदे वि.का.सेवा सह.सोसायटीच्या नावाने घडलेला बॅकेतील गैरव्यवहारात 2 ते 3 वर्षापुर्वी मयत झालेल्या शेतक-यांना स्वर्गात जाऊन कर्ज वितरण करणा-या बभळाज शाखेच्या तत्कालीन शाखाधिकारी व कॅशियर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडाळाने आजपावतो गुन्हा दाखल करुन त्यांच्या सत्कार केलेला नाही.  तर याच बॅकेच्या तळोदा शाखेत बॅक तपासणीस व शिपाई यांनी इतर आठ कर्मचा-यांच्या संगमताने रु. 1,88,98,140/- रक्कमेचा गैरव्यवहार करुन 3 ते 4 होत असून देखील त्यांना केवळ नोटीसच दिली जात आहे. व बॅकेच्या तत्कालीन लेखापरीक्षकांनी देखील साहेबाच्या वरदहस्तामुळे असे कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाही. आणि म्हणूनच या बॅक अधिका-यांना हे महित आहे की,आपण काहीही केले तरी आपल्यावर गुन्हा दाखल केले जाणार नाहीच नाही.त्यामुळे इतक्या बेडरपणे हे गैरव्यवहार व विनापरवाना व खाजगी सावकारी सारखे धंदे करत आहेत.त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी खात्यामार्फ़त करण्यात यावी.व दोषींवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी शेतक-यांमधून, बॅकेच्या दु:खी आत्म्याकडून व या सावकारीत अडकलेल्या त्रयस्त व्यक्तीकडून होत आहे.

चौकशीत घेण्यात यावेत असे मुद्दे:-

1)तळोदा शाखेतील ज्या संस्थांच्या सभासदांच्या नावाने गैरव्यवहार झालेले आहेत.त्या संस्थांच्या तत्कालीण लेखापरिक्षकांनी विशेष अहवाल सादर केलेला आहे काय ? नसल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

2)बॅकेच्या लेखापरिक्षण अहवालात घडलेल्या गैरव्यवहारांची नोंद घेऊन विशेष अहवाल सादर करुन गुन्हे दाखल करण्याची परवानगीची  मागणी केली आहे अथवा नाही? अथवा तशी परवानगी मागणी केलेली असल्यास निंबंधकाने का परवानगी दिली नाही ? याबाबीचा सखोल चौकशी करण्यात यावी.व दोषी लेखापरिक्षकावर गुन्हा नोंदविण्यात यावा. 

3)तळोदा शाखेतील गैरव्यहार करणा-या कर्मचारी/अधिकारी यांची चौकशी करुन गुन्हे नोंदण्यास दिरंगाई करणा-या जबाबदार अधिका-यास सदर गुन्हाचा सहभागीदार करुन गुन्हा नोंद करण्यात यावा.

4)आपल्या पदाचा गैरवापर करुन विना परवाना सावकारी करणा-या व त्यास साथ देणा-या बॅकेच्या इतर अधिका-यांवर सावकारी अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.

5)ज्या संस्थांच्या सभासदांच्या नावाने कर्ज भरणा करुन सावकारी करण्यात आली त्या संस्थेच्या कर्मचारी यांना देखील सावकारी गुन्हात समाविष्ठ करण्यात यावे.

6)तोंदे वि.का.सेवा सह सोसायटीतील मयत 2 ते 3 वर्षापुर्वी मयत झालेल्या शेतक-यांना स्वर्गात जाऊन कर्ज वितरण करणा-या बभळाज शाखेच्या तत्कालीन शाखाधिकारी व कॅशियर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्या सत्कार करण्यात यावा.अशी मागणी सर्वच स्थरावरुन होत आहे.

(सविस्तर वाचा पुढील अंकात)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध