Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ जुलै, २०२३

शिरपूर येथे आदिवासी कोळी जमातीची आक्रोश सभा संपन्न !



शिरपूर प्रतिनिधी:-दिनांक 23/7/2023 रोजी शिरपूर शहर व तालुकाच्या वतीने आदिवासी कोळी जमातीची अक्रोश सभा मनोमंगल कार्यालय वाघाडी बायपास या ठिकाणी घेण्यात आली.या अक्रोश सभेला समाजातील सामजिक, प्रतिष्ठित,व न्यायप्रविष्ट मान्यवर उपस्थित होतेआदिवासी कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले सुलभतेने कसे मिळतील व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कशाप्रकारे फाईल तयार करावी याविषयीचे कायदेशीर व सखोल ज्ञान आलेले समाजसेवक व विधितज्ञ यांनी जमात बांधवांना केले...
यावेळी 2011 ची जनगणनेच्या आधारे शासनाच्या Escc ड्रॉपच्या आधारे आदिवासी कोळी जमातीचा अनुसूचित जमातीत सर्वे झाला असुनसुद्धा कशाप्रकारे आदिवासी मंत्री व प्रशासनात बसलेले अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन आदिवासी कोळी जमातीच्या नावाने आलेला निधी आदिवासी कोळी जमातीपर्यंत  न पोहता कशा प्रकारे संगनमत करुन खातात व वरुन आदिवासी कोळी जमात बांधवांना बोगस म्हणतात यावर अॅड.श्री.गणेश सोनवणे,नामदेवअप्पा येळवे, मोतीलाल सोनवणे,मनोहर वाघ,डॉ.गोकुळ बिऱ्हाडे यांनी आदिवासी जमात बांधवांना मागदर्शन केले. 


अन्यायाला वाचा फोडण्यासाठी घटनेने घटनादत्त अधिकार दिला असुनसुद्धा आदिवासी कोळी जमातीला जात प्रमाणपत्र मिळत नाही.हा आदिवासी कोळी जमातीचा गंभीर प्रश्न आहे.
प्रशासन आदिवासी कोळी जमातीकडुन जात प्रमाणपत्रासाठी 1950 पुर्वीचे जातीचे पुरावे मागता,पण आदिवासी विभागाने 1950 पुर्वीचा जातीचा पुरावा प्रशासनाने मागु योग्य नये तर 1950 पुर्वीचा रहिवासाचा पुरावा अर्जदाराकडुन घेऊन अर्जदारास जात प्रमाणपत्र निर्गमित करावे अशा आशयाचे पत्रक सदरील विभागाने काढले आहे.

तरीसुद्धा प्रशासन आदिवासी कोळी जमातीवरच अन्याय करत असुन आदिवासी कोळी जमात प्रशासना विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही..
 भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी सुद्धा आदिवासी कोळी जमातीला जात प्रमाणपत्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो...हि गोष्ट खुपचं लाजीरवाणी आहे...शिकेल तो टिकेल, संघर्ष करा संघटित व्हा ! असा नारा यावेळी देण्यात आला... 2011 च्या जनगणनेनुसार आदिवासी कोळी जमात अनुसूचित जमातीच्या कोष्टकाखाली सर्वेक्षण करण्यात आलेला आहे व त्या सर्वेक्षणानूसार आदिवासी कोळी जमातीला अनुसूचित जमातीत मोडण्यात आले आहे.
ह्या सभेत आदिवासी कोळी जमातीने जातीचे प्रमाणपत्राबाबत आपले अभिप्राय नोंदवीले.. 33 आदिवासी जमातींना त्यांच्या अधिकारापासुन वंचित ठेवल्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत आदिवासी कोळी जमात जाहीर बहिष्कार टाकण्याची सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.आपला लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवु असे यावेळी ठरविण्यात आले. 

या कार्यक्रमाला किशोर शिरसाठ,नितीन आखडमल,गोपीचंद बोरसे,पत्रकार,किशोर शिरसाठ, शांतीलाल कोळी,कल्पनाताई बोरसे,सोनालीताई आखडमल,
जयश्रीताई शिरसाठ,बोरसे ताई,निलेश कोळी,लोटन कोळी,मगरे सर,प्रभाकर सोनवणे,वाल्मिक कोळी,पिंटु कोळी,श्याम कोळी,विनोद कोळी,
विकास कोळी,हेमंत सावळे,प्रस्तावना व सूत्रसंचलन,कोळी सरांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन हिराभाऊ वाकडे,दिनेश कोळी,महेश सावळे,राहुल सोनवणे,नाना शिरसाठ,अविनाश कोळी,भटु कोळी,गणेश कोळी, गणेश सोनवणे व आदिवासी जमात बांधवांनी केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध