Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ जुलै, २०२३

तोंदे विकास सोसायटीच्या फेरलेखापरिक्षकांसोबत आलेल्या गुंडांनी ग्रामस्थांना दाखवला तीक्ष्ण हात्यारांचा धाक...! बचत गट घोटाळ्यामुळे बँकेतील वसीलेबाज व जातीवादास बसला आळा.



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील तोंदे विकास सेवा सहकारी संस्थेच्या फेर लेखापरीक्षकाने आणलेल्या बाहेरील गुंडांकडून भानगड केलेल्या ग्रामस्थांच्या मानेला तीक्ष्ण हत्यार लावल्याचे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तीने सांगितले आहे.संस्थेचे चेअरमन यांनी आलेल्या अधिकाऱ्यची हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी तेथे थांबण्याचे सांगितले होते व त्यांचे आदेशान्वये मी तिथे थांबलो असता,त्या अधिकाऱ्यांनी मलाच अर्वाच्य व अश्लील शिवीगाळ केली.मी त्यांना आहो साहेब आपण दारूच्या नशेत आहात आपण काय बोलतात हे आपल्याला माहित आहे का,? असे बोलले असता त्यांनी मला मारझोड करण्यास सुरुवात केली.व त्याबरोबर असलेला एका गुंडांणे माझ्या मानेला तीक्ष्ण हत्यार लावले त्यामुळे त्या हॉटेलमध्ये असलेले परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून मागे ओडले मात्र त्यांना देखील शिवीगाळ केल्याने ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना मनसोक्त मार दिला.ही माहिती खुद्द संबंधित व्यक्ती व संस्था चेअरमन यांनी दिली आहे.

असे असताना तोंदे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच यांनी विनापरवाना आपल्या ग्रामपंचायतीत बसलेल्या या अधिकाऱ्यांबाबत आपली कोणतीच भूमिका का स्पष्ट केले नाही हे मात्र नवलच

तर दुसरीकडे शनिवार रविवारची असलेल्या सुट्टीचा आस्वाद घेत .... शेतकरी बँकेच्या दुखी आत्म्यांनी आमच्या कार्यालयात भेट दिली त्यावेळेस आमच्या बातमी बाबत त्यांनी आमचे कौतुक करत आभार मानले, व त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगत दिलेली माहिती म्हणजे आमच्या.....या शेतकऱ्यांच्या बँकेत वशिलेबाजी व जातीयवाद मोठ्या प्रमाणात फोफावला होता यामुळे असे वरदहस्तक कर्मचारी हेच शिरपूर शहरात नोकरी करत होते.

यांच्या बदल्या देखील स्थानिक स्तरावर होत्या मात्र आपण सत्य परिस्थिती मांडत दिलेल्या बचत गट घोटाळ्याची बातमीमुळे या सर्व वशिलेबाज व या सराईत सावकारांना बाहेर काढत इतरांना न्याय मिळाला.तसेच खरोखरच शिरपूर तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात देखील अशी सावकारी सुरू आहे हे आम्हाला देखील माहीत असल्याचे त्यांनी माहिती आम्हास दिली.तसेच तरुण गर्जणा मार्फत होत असलेल्या सर्व खुलासांबाबत आम्ही आपले आभारी आहोत.अशा प्रकारे त्यांनी तरुण गर्जणा वृत्त सेवेचे आभार मानले आहे.
(वाचा सविस्तर पुढील अंकात)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध