Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ जुलै, २०२३

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे यांची कन्या कु योगिता याच्या वाढदिवसानिमित्त...!



शिरपूर प्रतिनिधी:+महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे यांची कन्या कु.योगिता मोरे तिच्या वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कु.योगिताच्या
वाढदिवसानिमित्ताने आज दिनांक 24 जुलै रोजी तिच्या ब.ना.कुंभार गुरुजी विद्यालयात 80 वृक्ष लागवड करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेत देखील 20 वृक्ष देण्यात आले आणि शहीद जवान मनोज माळी यांच्या स्मारक जागी 200 वृक्ष देण्यात आले. 

असे टोटल 300 वृक्ष या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आले यावेळी उपस्थित ब.ना.कुंभार गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती एस व्हीं कोठारी पर्यवेक्षक श्री एस व्हीं सोनवणे.श्री सी यू मोरे सर,श्री धनंजय देवरे सर वाघाडी गावचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी,उपसरपंच जगदीश कोळी,मनसेचे धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिराळे,मनसे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे,मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील,वाघाडी 
ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी,विक्की मोरे,विनोद कोळी, मयूर कोळी,प्रशांत मोरे तसेच अधिव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध