Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

दुःखात देखील बभळाज येथील राजकुमार जैन यांनी उभा केला आदर्श...! सामाजिक रिती रिवाज मधे बदल करून गावातील गरजूंना मदतीचा हात...!



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजकुमार जैन यांना दिनांक ५ जुलै रोजी पितृशोक झाला.वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे वडील भवरलाल जैन यांनी अल्पशा आजारानंतर जगाचा अखेरचा निरोप घेतला. राजकुमार जैन यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यांनी स्वतासह परिवाराला सावरत नेहमी प्रमाणे एक नवीन सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.वडिलांचे मृत्यूनंतर करण्यात येणारे सर्व विधी, उठवणा हे लगेच दुसऱ्या दिवशी जवळच्या नातेवाईकांच्या समवेत संपन्न करून घेतले.तर याच दिवशी त्यांनी घरगुती छोट्या स्वरूपात उत्तरकार्यही करून घेतले.अधिकचा आर्थिक खर्च न करता यात बचत केली.जैन हे नेहमी वायफळ खर्च न करता लोकांना उपयोगी व जास्तीत जास्त कशी मदत करता येईल अशी संकल्पना राबवीत असतात.
उत्तरकार्याच्या बचत रकमेतून गावातील गरजू रुग्णांसाठी आवश्यक असलेले रुग्णांचे बेड, व्हील चेअर, टॉयलेट चेअर, चालण्यासाठी वॉकर, वॉटर बेड,एयर बेड यासह सर्व साहित्य खरेदी करून लोकांच्या वापरासाठी देण्याचा जाहीर केला आहे.

राजकुमार जैन हे परिसरात नेहमीच दानधर्म व मदत कार्य करण्यात आजपर्यंत अग्रेसर राहिले आहेत.आता त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखानंतर देखील त्यांनी सामाजिक भान जपून जुन्या रुढी परंपरा यांना छेद देत नवीन परंपरा तयार करून सामाजिक बदल करत लोकांसमोर नविन आदर्श उभा केला आहे.

जैन परिवाराने घेतलेले या निर्णयाचे सर्व गाव परिसरातून व जैन समाजातून कौतुक होत असून इतरांनी देखील यापासून संदेश घ्यावा असे मत सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे.असे सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांना गावातील ग्रामस्थांचे व मित्र परिवाराचे सहकार्य मिळत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध