Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
अखेर उध्दव ठाकरेंच्या निकटवर्तीय नीलम ताई गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश,मात्र फडणवीसांची उपस्थिती उद्धव ठाकरेंसाठी आश्चर्ययाचा धक्का
अखेर उध्दव ठाकरेंच्या निकटवर्तीय नीलम ताई गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश,मात्र फडणवीसांची उपस्थिती उद्धव ठाकरेंसाठी आश्चर्ययाचा धक्का
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे ठाकरे गटातील महिला आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले होते.त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसल्याचे मानले जाते.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत,हे एका पत्रकातून सांगितलं आहे.
तसेच,बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांनी म्हटलं.तसेच,सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता,सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते,असेही गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान,नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आणखी नेते उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला.शिवसेनेतील बहुतांश आमदार शिंदेंच्या पाठिशी गेले.
जवळपास ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात जात एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले.त्यानंतर राज्यभरात पदाधिकारी आणि शिवसैनिकही शिंदेंसोबत जात होते.
त्यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला.सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील महिला आघाडीत प्रचंड वाद सुरू झाले.सुषमा अंधारेंना दिले जाणारे महत्त्व अनेकांना रुचले नाही.त्यातून नाराज होत अलीकडेच मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा