Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जुलै, २०२३

तरुण गर्जनाचा दणका ; शिरपूर तालुक्यातील बचत गट घोटाळ्यातील शेतकऱ्यांच्या बँकेतील दोषी अधिकाऱ्यांच्या बदल्या...! मात्र बदली म्हणजे शिक्षा नव्हे... ! संतप्त शेतकऱ्यांचा करारा सवाल...!



शिरपूर प्रतिनिधी:-:सध्या स्थिती जिल्ह्यातील नामांकित शेतकऱ्यांच्या बँकेतील शिरपूर तालुक्यातील बचत गट घोटाळा प्रकरण जोमात सुरू असल्याने सदर शेतकऱ्याच्या बँकेने बचत गट घोटाळ्यातील दोषींच्या बदल्या केल्यात,मात्र सदर बदल्या ह्या केवळ तालुक्यातच राहिल्यात त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बदल्या करणे म्हणजे शिक्षा नव्हे,तर त्याची कसून चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरूपाचे कार्यवाही होणे हे महत्त्वाचे आहे.

जेणेकरून भविष्यात असे कोणतेही नाट्य पुन्हा उभे राहणार नाही.या शेतकरी बँकेत भूतकाळात घडलेले इतर घोटाळ्यांमधील दोषी जसे आजही मोकळे फिरत आहे त्यामुळे आपण काहीही केले तरी बँक व संचालक आपल्यावर कोणत्याही प्रकारची गुन्हे दाखल करणार नाही ही संकल्पना मिटवली जाईल.यासाठी सर्वप्रथम बदली नावाची शिक्षा म्हणजे यांना धडगाव व अक्कलकुवा अशा ठिकाणी बदली करून थोड्या प्रमाणात का होईना शिक्षा दिली गेली पाहिजे होती.मात्र या घटनेतील दोषी कर्मचाऱ्यांमध्ये राजकीय व्यक्तींचे वरदहस्त असलेले तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळीक असल्याने त्यांच्या बदल्यात तालुक्यात करून आपली प्रेमाची झालंर त्यांच्यावर कायम ठेवली.असं शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

म्हणून आता तरी बँक प्रशासनाला जाग येईल का व झालेल्या बदलाबाबत पुनर्विचार करून थोड्याफार प्रमाणात का होईना शिक्षा म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा अशा ठिकाणी बदला होणार का ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून व काही दुखी आत्म्यांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला आहे.यानंतर नेमकं बँक प्रशासन यावर काय विचार करते याकडे शेतकरी व सभासद यांचे लक्ष लागून राहिले आहे.

( वाचा सविस्तर पुढील अंकात)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध