Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी साहेब यांचा पीक पाहणी दौरा करण्यात आला



आज मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी साहेब यांनी साक्री तालुका पिक पाहणी दौरा केला. यामध्ये पिंपळनेर व दहिवेल मंडळातील विविध पीक प्रात्यक्षिके- सुधारित तंत्रज्ञानाने सोयाबीन, मका, नाचणी लागवड तसेच सोयाबीन मिनी किट प्लॉट, कांदा चाळ, सामूहिक शेततळे, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे व परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत सेंद्रिय भात लागवड, धैंचा लागवडीची तसेच तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी यापुढे सेंद्रिय खतांना व सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे जेणेकरून जमिनीची पोत टिकून राहील यावर देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले काही ठिकाणी कमी पाऊस असल्याने दुबार पेरणीचे देखील संकट असल्याने तेथील ही पीक पाणी माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केली शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर वाढवावा व आपल्या शेतीचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे यावेळी तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, कृषी अधिकारी चेतन सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी सुरेंद्रनाथ शिंदे, तानाजी सदगीर, हरिदास पवार तसेच दोन्ही मंडळातील क्षेत्रीय कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध