Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील तोंदे सोसायटीच्या फेर लेखापरिक्षकाने दारू पिऊन केली हाणामारी...! मटनाबारोबर खाला ग्रामस्थांच्या हाताचा इथेच्छ मार...!
शिरपूर तालुक्यातील तोंदे सोसायटीच्या फेर लेखापरिक्षकाने दारू पिऊन केली हाणामारी...! मटनाबारोबर खाला ग्रामस्थांच्या हाताचा इथेच्छ मार...!
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील तोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नावाने बॅक अधिका-यांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पातक पुन्हा संस्थेच्या माथी मारण्यासाठी आपल्या मर्जीतील एस.के.ठाकरे यांची फेर लेखापरीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.या बहाद्दराने ब-याच दिवसापासून फेर लेखापरीक्षणाकडे पाठ फिरविलेली होती.प्राप्त माहितीनुसार अचानक जाग आल्यानंतर फेर लेखापरीक्षणाचे कामकाज आपल्या दोन सहकार्यासह व शिरपुर तालुका लेखापरीक्षकासह 8-15 दिवसापासून सुरु केले.
या लेखापरीक्षणासाठी संस्थेच्या शेतक-यांच्या रुजूवाती घेण्याचे कामकाज दि,7 व 8 जुलै 2023 ही तारीख ठरविण्यात आली.रुजूवाती घेण्याचे कामकाज गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले.मात्र यासाठी या बहाद्दराने ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी घेतली नाही.मी मझेच सर्वकाही व मी ठरवलेच तेच सत्य अश्या अवेश्यात रुजूवातीचे कामकाज शेतक-यांना उलट सुलट व अनावश्यक प्रश्न विचारून व धमकीच्या सुरात घेण्यात आले.प्रत्यक्ष शेतकऱ्याने लेखी व टायपिंग स्वरूपात तयार करून आणलेला रुजवत न घेता मी सांगेल तसा तो माझ्यासमोर लिहून देणे अशा प्रकारात घेण्यात आले.
खरे पाहिले तर या ग्रामपंचायतीवर अतिशय कर्तव्यदक्ष लोकनियुक्त सरपंच निवडून आलेले आहेत.मग यांनी विनापरवानगी आपल्या ग्रामपंचायतीत यांना कसे व का बसू दिलेले ? यामागे यांचा नेमका स्वार्थ काय ? असे कितीतरी प्रश्न समोर येत आहेत.दुस-यांच्या भानगडी सोडवणारे व कायम इतरांना न्याय देणारे सरपंच अता आपल्या गावाच्या ह्या प्रकरणाबाबत नेमके काय भूमिका घेतील याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
फेर लेखापरीक्षक एस.के.ठाकरे यांनी रूजूवात ची जागा निश्चित करण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतली नाही ही पहिली चूक,आपल्या मनाप्रमाणे रुजवत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करणे ही दुसरी चूक,शासयकिय कामकाज करतांना स्थानिक शेतक-यांना घाबरवण्यासाठी बाहेरील गुंड प्रवृत्तीचे तरुण बरोबर घेऊन जाणे ही तिसरी चुकी,शासकिय कामकाज करतांना संस्था चालकाकडून बळजबरीने मटनाच्या जेवनाची मागणी करणे ही चौथी चुक,दोन किलो मटन खादाड्यासाठी मिळाल्यानंतर मनसोक्त दारु डोसलने ही पाचवी चुक,व दारूच्या नसेत ग्रामस्थांना व संस्था चालकांनाच शिवीगाळ करुन इथेच्छ मारखाणे ही सहावी चुक, व अश्या प्रकारे शासकिय कामकाज करतांना “ आपल्या बापाचे सरकार व आपल्या बापाचा कायदा”अश्या प्रकारे वागणे ही अजून एक महाचूक केलेली आहे. त्यामुळे या फेर लेखापरिक्षकावर तात्काळ निलबंनाची कारवाई सहकार विभाग व त्यांचे वरिष्ठ अधिकारी करतील का ? आपल्या कर्मचा-यास वाचविण्याचा प्रयत्न करतील ? याकडे तोंदे गावातील शेतक-यांबरोबरच परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
(या फेरलेखापरीक्षणा मागील सत्य वाचा सविस्तर पुढील अंकात....)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा