Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेतक-यांच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा जनसामान्याच्या समोर लवकरच उघड....! शेतक-यांच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा जनसामान्याच्या समोर लवकरच उघड....!
शेतक-यांच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा जनसामान्याच्या समोर लवकरच उघड....! शेतक-यांच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा जनसामान्याच्या समोर लवकरच उघड....!
शिरपूर प्रतिनिधी:- सध्या जिल्हातील एका नामाकिंत शेतकरी बॅकेतील शिरपूर तालुक्यात बचत गट घोंटाळा प्रकरण खूपच जोमाने गाजत आहे. बॅकेच्या एका वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक कनिष्ठ आधिकारी यांच्यावर दबाब निर्माण करुन व बचत गट तपासणीस यांच्या मदतीने त्यातच एका सराईत विनापरवाना सावकारी करणा-या बॅक अधिकारीला सोबतीला घेऊन वि.का.से.सोसायटीच्या सभासदांच्या नावाने कर्जाचा भरणा केलेला आहे.व तात्काळ याच सभासदांच्या कर्ज मागणी याद्या मंजूर करुन शेकडा 3 ते 5 टक्के मासीक दराने व्याज रक्कम सभासदांकडून व त्याच्या कर्ज खात्याच्या एटीएम द्वारे काढून कर्जाचे नुतनीकरण करुन व्यवहार केलेले आहेत.
बँकेतील आपल्या पदाचा गैरवापर करुन खाजगी सावकारी करणारे व शेतकऱ्यांना लुटणारे, बॅकेतील सावकारांनी बॅक कर्मचा-यांच्या त्याचा भाऊ एका सहकारी अधिका-यांची बायको व त्याचे मित्र अश्या त्रयस्त व्यक्ती तर बॅक कर्मचारी हे बचत गटाचे सभासद नसतांना देखील त्यांना कर्ज देण्यासाठी बचत गटातून वैयक्तीक सावकारीसाठी पैश्याचा वापर केलेला आहे.खरे पाहता बॅकेने नियुक्त केलेल्या पदाचा गैरवापर करुन मागील 6 -7 वर्षापासून सराईतपणे असा व्यवहार सुरु असल्याचे बॅकेच्या काही दुखी आत्मांनी आम्हास माहिती दिली आहे.मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणून या बॅक अधिका-यांने आपला विनापरवाना सावकारी व्यवसाय वाढीसाठी आपल्या अधिकाराचा व पदाचा पुरेपुर गैरवापर करत आपल्याच अख्तारीत असलेल्या 3 - 4 संस्थेच्या कर्मचा-यास शेकडा मासिक 1 टक्केचे अमिश तोंडाला लावून आपले काम सोयीस्कर केले आहे.
इतकेच नव्हे एका चांगल्या बॅकरला आपल्या पैश्यावर कसे जास्तीत जास्त टक्केवारी कमवता येईल, हे चांगलेच माहिती असते, आज ज्या शेतक-यांच्या संस्थेत पैसे भरले.त्यांची यादी दोन दिवसात मंजूर करयाची कारण मंजूरीचे अधिकार आपल्याकडेच असल्याने त्याचा पुरेपुर उपयोग कशा करायचा ते सांगण्याची गरज नाही.चौथ्या दिवशी ते पैसे बॅक एटीएम/शॉप मशीनद्वारे तीन वाजे पर्यत काढले जातात.या चार दिवसाचे देखील पुर्ण महिन्याचे 4 टक्के व्याज मिळते.कारण याचा नियमच असतो, पैसे एक दिवस वापरा अथवा एक महिना व्याज पुर्ण महिन्याचेच घेतले जाते.त्यामुळे हुशार बॅकर तो पैसा चौथ्या दिवशी आपल्या खिशात न ठेवता पुन्हा दुस-या संस्थेच्या शेतकरी सभासदांच्या नावाने भरणा केला जातो.अश्या प्रकारे महिन्यात कमीत कमी 5 ते 6 वेळा फ़िरवले जातात व कर्जाचे नुतनीकरण (कर्जाचे उलटी-पलटी व्यवहार) केले जाते महिन्यात 6 वेळा फ़िरलेल्या पैश्यावर मासिक शेकडा 24 टक्के दराने व्याज कमविले जाते. एप्रिल ते जून या तीन महिन्यात एकाच रक्कमेवर अश्याप्रकारे पैश्याची हेराफ़ेरी केल्यास शेकडा 72 टक्के व्याज कमविले जाऊ शकते.म्हणजे उदाहरण दाखल घेतल्यास रु.पाच लाखावर तीन लाख साठ हजार रुपये तीन महिन्यात कमविले जाते.व गटाचे तीन महिन्याचे व्याज रु.तीस हजार होतात.मग उरलेल्या तीन लाख तीस हजाराचा व्याज रुपी मलिदा संपुर्ण आपल्याच खिसात किंवा असल्यास एखाद-दोन भागीदार तेही यासारख्या पत व्यवसायत असतील तर त्यांना हा हिशोब समजतो म्हणून.
खरे म्हणजे आयकर व ई-डी विभागानेच अश्या सावकाराचे खाते तपासलेच पाहिजेत अशी मागणी शेतक-यांमधून, बॅकेच्या दु:खी आत्म्यांकडून व या सावकारीत अडकलेल्या त्रयस्त व्यक्तीकडून होत आहे.
(याच शेतक-यांच्या बॅकेतील अजून इतर घोटाळे देखील होऊ शकतील उघड - वाचा सविस्तर पुढ़ील आकांत)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा