Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
मणिपूरमधील 'नग्न'सत्य आणि हिंसाचार विरोधात जळगाव शहरासह आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात मोठ्या संख्येने "आक्रोश कँडल मार्च"
मणिपूरमधील 'नग्न'सत्य आणि हिंसाचार विरोधात जळगाव शहरासह आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात मोठ्या संख्येने "आक्रोश कँडल मार्च"
मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देश्याच्या लोकांना पडला आहे. तेथे दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली.सामूहिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळिमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी मे महिन्यातील ही घटना उशिरा जरी उघड झाली असली, तरीही आपल्या देशातील भाजपा सत्ताधारी आपल्या मस्तीत आणि मन मर्जीच्या तालात दंग आहेत.मणिपूर मधील हा व्हिडीओ घराघरांतील अनेकांनी पाहिला, पण डोळ्यांत आलेले पाणी पुसण्याव्यतिरीक्त कोणीही काही करू शकलेले नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे,परंतु केंद्रातील व राज्यातील मोदी सरकार कोणतीच कारवाई करत नव्हते. त्याचाच फायदा घेऊन महिलांना विवस्त्र फिरवून त्यांच्यावर बलात्कार करण्यापर्यंत त्या आरोपींची मजल गेली आहे.भाजपचे राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे बघता,
लोकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार संपूर्ण देशातील जनतेला मान खाली घालावी लागेल असाच आहे.
मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे.पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना मोकळीक दिली असे तरी सध्या दिसते आहे ह्या हिंसाचाराविरोधात आम आदमी पार्टीने संपूर्ण देश्यासह, राज्यात नागपूर, अमरावती,जळगाव,सांगली,पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरात मोठ्या संख्येने "आक्रोश कॅडल मार्च" काढला आहे. महाराष्ट्र राज्य सचिव.संघटक. नवीनदर अहुवलिया यांच्या नेतृत्वाखाली सदर कॅन्डल मार्च करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष.तुषार निकम सर. महानगराध्यक्ष.योगेश हिवरकर. सल्लागार.डॉ.सुनील गाजरे सर.युवा महिला आघाडी अध्यक्ष.अमृता नेतकर.मीडिया प्रमुख योगेश भोई. मिलिंद चौधरी.विजय दानेज.अनिल वाघ.माधवराव जाधव.पवन खंबायत. सरिता तायडे.डॉ.नारायण अटकोरे आधी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा