Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ जुलै, २०२३

पी.एम.बायोटेकची सोयाबीन पिका संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन



आपल्या परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्वाचे पीक असून या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.तर आज आपण या लेखामधून सोयाबीन लागवडीबाबत माहिती जाणून घेऊया.
पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये वापसा असताना १५ जुलै पर्यंतच सोयाबीनची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
जमिनीत चांगली ओल असल्यावरच पेरणी करावी.पेरणी करून पाणी दिल्यास बियाणांची उगवण कमी होते.
एकरी ३५ ते ४० किलो बियाणे पुरेसे असतात.बियाणे घराऊं असेल तर त्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी म्हणजे उगवण क्षमता चांगली होते

पेरणीचे अंतर -
दोन ओळीतील अंतर ३० सें.मी ते ४५ सें.मी व दोन रोपातील अंतर ५ ते ८ सें.मी याप्रमाणे पेरणी करावी.
(३० x ८ सें.मी) किंवा (४५ x ५ सें.मी) या अंतरावर पेरणी केल्यास जेणेकरून रोपांची संख्या ३ ते ५ लाख एवढी राहील
पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी.
पेरणी करताना बियाणे ३- ४ सें.मी.पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.

खते -
पेरणीपूर्वी १८:४६:०० @५० किलो + काला हे खत 50 किलो प्रति एकर बेसल डोस मध्ये द्यावे.
खुरपणीनंतर किंवा तणनाशक फवारणी नंतर १८:१८:१० - पी एम बायोटेकचे काला 50 किलो प्रति एकरी द्यावे.

पी एम बायोटेकची खते वापरण्याचे फायद

१) पिकाला संतुलित प्रमाणात व गरजेनुसार पोषक घटक उपलब्ध करून देते.
२) पिकाची सर्वांगीण वाढ व विकास करते.
३) पी.एम.बायोटेकचे काला हे खत पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविते.
४) जमिनीमधील रासायनिक खतांचा अपव्यय कमी करण्यास मदत करते.
५) जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत करते.
६) शेतमालाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यास पी एम बायोटेकची उत्पादने अधिक फायदेशीर ठरतात.

टीप - हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा दर चार ओळीनंतर चर काढावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध