Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ जुलै, २०२३

शिरपूर तालुक्यातील बचत गट घोटाळ्याची कसून चौकशीची मागणी...! शासन आपल्यादारी योजनेत तक्रारी अर्ज समाविष्ठ होण्यासाठी प्रत्यशिल...!



शिरपूर प्रतिनिधी:- पुढील आठवाड्यात म्हणजे 10 जुलै रोजी खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथरावजी शिंदे व माजी उपमुख्यमंत्री मा.देवेद्रजी फ़डणवीस हे धुळे जिल्हा दौ-यावर येणार आहे,यासाठी प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी 27 नोडल अधिकारी व त्यांना इतर सहाय्यक अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.

सध्या जिल्हातील एका नामाकिंत शेतकरी बॅकेतील शिरपूर तालुक्यातील बचत गट घोंटाळा प्रकरण खूपच जोमाने गाजत आहे.या बचत गट घोंटाळ्याची कसून चौकशी मा.सहकार आयुक्त कार्यालयामार्फ़त होण्यासाठी तरुण गर्जना मार्फ़त निवेदन सादर करण्याचा व शासन आपल्या दारी योजनेत ते समाविष्ठ होण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

या निवेदनात सर्व दोषींची नावे पदासह उघड होणार....

इतकेच नव्हे तर या बॅकेतील इतर घोंटाळ्यांचे देखील मा.सहकार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फ़त चौकशी होणेकामी पोक्त पुराव्यासह निवेदन सादर करण्याचा पुरेपुर पर्यत्न करण्यात येणार असल्याचे खुद्द तरूण गर्जनाचे संपादक यांनी सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध