Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते शुभारंभ
शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते शुभारंभ
धुळे, दि. 7 :'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची माहिती जनसामान्यापर्यंत एलईडी चित्ररथामार्फत पोहचविण्यात येत आहेत. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या चित्ररथाचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते फित कापून उद्धघाटन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, भूसंपादन अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत धुळे जिल्ह्यात सोमवार 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान,धुळे येथे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास 12 हजारापेक्षा जास्त लाभार्थी तसेच जवळपास 30 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चित्ररथाव्दारे चारही तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहेत. धुळे येथील आयोजित मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहनही श्री. शर्मा यांनी यावेळी केले.
या चित्ररथाव्दारे आज शिरपूर येथे, 8 जुलै, 2023 रोजी शिंदखेडा, 9 जुलै, 2023 रोजी साक्री तसेच 10 जुलै, 2023 रोजी धुळे येथे जनजागृती करण्यात येणार आहे .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा