Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

शिरपूर शहर पो.स्टे.डी.बी.पथकाची मोठी कामगिरी...! पाच मोटार सायकलीसह 2 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त...!

 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातून पित्ररेश्वर कॉलनी येथून घरासमोरून मोटरसायकल चोरीस गेल्या बाबत शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी विशाल रणजीत चौधरी वय 30 व्यवसाय खाजगी नोकरी यांनी गुन्हा दाखल केला होता. दि.०७/०८/२०२३ रोजी रात्री ९.३० से ११.३० वा सुमारास गौरव हॉटेल करवंद रोड शिरपूर येथून त्यांच्या मालकीची होंडा कंपनीची शाइन मो.सा.क्र.एम.एच.१८/ बी.टी.५६३७ कोणी तरी अज्ञात विश्वास चोरून नेल्याबाबत नोंद केली आहे.
 
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर, शिरपूर शहर पोलिस स्टेशन यांनी शोध पथकाला तपास कामी आदेश केले होते.या गुन्ह्याच्या तपास करत असताना शोध पथकाला गोपनीय बातमीदार यांनी माहिती दिली की एक इसम शाइन मोटार सायकल कमी किमतीत विकत असल्या माहिती प्राप्त झाली सदर इसमाचा शोध घेऊन विचारले असता त्याचे नाव विनोद अशोक कोळी रा.कोठली ता.शहादा असे सांगितले असून त्याने सदरची मो.सा.काहटूळ ता.शहादा जि.नंदुरबार येथून चारी केली असल्याचे सांगितल्याने शहादा पी.स्टे.जि. नंदुरबार यांकडेस खात्री केली असता सदरची मो.सा.शहादा पो.स्टे.नं. ४९६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील माल असून तीचा इंजी नं MEYC६५४ GIIT७४४९४४ चेचीस नं. ६५११२०७५६ असून सदरची मो सा.चोरीची असल्याची खात्री झाल्याने मो.सा. हस्तगत करण्यात आली आहे.
 
तसेच वरनमुद आरोपीतास गुन्ह्यात अटक करून मा.न्यायालयाने त्यास दि. १२/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिल्याने त्यास विश्वासात घेतले असता  तपासात सदर आरोपी ने अजून 4 मोटरसायकली चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीच्या 4 मोटरसायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत.त्यामुळे शहादा,चोपडा येथील इतर गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.या आरोपीकडून एकूण 5 मोटरसायकल किंमत 2 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र अखंडमल हे करत आहेत.

सदरची कामगिरी पो.अधिक्षक संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे ,पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर शिरपूर शहर पो.स्टे,शोध पथकातील पो.कॉ.ललित पाटील, लादूराम चौधरी पो.ना.रवींद्र अखंडमल,मनोज पाटील, पो.कॉ. विनोद अखंडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे ,प्रशांत पवार,भटू साळुंखे ,सचिन वाघ ,मनोज दाभाडे, मनोज महाजन ,आरिफ तडवी तसेच होमगार्ड मिथुन पवार राम भील,चेतन भावसार व शरद पारधी इ पथकाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध