Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

सांगवी परिसरात दंगलीनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता...! दंगाई आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू...!


शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सांगवी या गावाला 9 ऑगस्ट क्रांती दिवस च्या निमित्ताने लावलेले शुभेच्छा बॅनर दिनांक 10 रोजी अज्ञात इसमाने फाडल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण होऊन भावना दुखावल्याने वाद वाढला व पुढे या वादाचे रूपांतर दंगलीत झाले.दोन्ही गटाकडून मोठा जनसमुदाय रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक व रास्ता रोको केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.


प्राथमिक स्तरावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलीस गाडीवर तहसीलदार शिरपूर यांच्या गाडीवर तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेलेले शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा अशा सर्वांच्या वाहनांची तोडफोड केली.यात अनेक पोलीस कर्मचारी व शांततेसाठी मध्यस्थी करणारे देखील जखमी झाले आहेत.तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब बंदोबस्त वाढवण्यात आला.अतिरिक्त पोलीस फोजपाटा मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित केले.सध्या सांगवी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

या घटनेचा सखोल तपास करत पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून 150 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत जवळपास 21 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.व इतर आरोपींच्या शोध सुरू आहे.

दरम्यान शांतता प्रिय व शिस्तप्रिय असा शिरपूर तालुक्याला या घटनेने गालबोट लागले असून सदरची घटना ही सू नियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप आमदार काशीराम पावरा यांनी केला असून या दंगली मागे असमाजिक तत्त्वांच्या हात असून युवकांची माथी भडकवून काही समाजकंटकांनी ही दंगल घडून आणली असा आरोप माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल यांनी केला आहे.

दरम्यान तालुक्यात तणावपूर्ण शांतता असून लोकांनी कोणत्याही अफवांना बळी न जाता प्रशासनास सहकार्य करावे व शांतता प्रस्तावित करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध