Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

धुळे जिल्हा परिषदेतील 352 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम गुप्ता यांची पत्रकार परिषदेत माहिती



धुळे -जिल्हा परिषदेच्या विविध विभागात गट क मधील सरळ सेवेची रिक्त असलेली  ३५२ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दिनांक 5 ऑगस्ट 2023 ते दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, अशी माहिती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 जिल्हा परिषद धुळे अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्याबाबतची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते. यावेळी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम गुप्ता म्हणाले, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत विविध विभागातील गट संवर्गांमधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रिक्त पदांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक 01 पद, आरोग्य सेवक (पुरुष )50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 59, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) महिला 206, औषध निर्माण अधिकारी 07, कंत्राटी ग्रामसेवक 05, कनिष्ठ अभियंता( स्थापत्य)( बांधकाम) 06, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 01, मुख्य सेविका पर्यवेक्षिका 08, पशुधन पर्यवेक्षक 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03, वरिष्ठ सहाय्यक (लेखा )03, विस्तार अधिकारी कृषी 01, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) 41 अशा एकूण 352 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर  दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सदर जाहिरात जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी शर्ती इत्यादी बाबी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथील संकेतस्थळ https://dhule.gov.in व https://dhulezp.mahapanchayat.gov.in या धुळे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर  पाहण्यास उपलब्ध आहे. मदतीसाठी जिल्हा परिषद धुळे च्या 02562 - 240188 या दूरध्वनी क्रमांकावर दिनांक 5 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे आवाहन श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध