Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

साक्री तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळनेर पश्चिम पट्यात शासनाकडून महसूल सप्ताहचे आयोजन



दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अतिदुर्गाम अशा नांदर्खी गावामध्ये "महसूल सप्ताह" निमित्त महसूल आदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त मा. राधाकृष्ण गमे साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिनव गोयल साहेब,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शुभम गुप्ता साहेब, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा.कुरबान तडवी साहेब,प्रातांधिकारी रविंद्र शेळके, धुळे प्रकल्प अधिकारी मा. प्रमोद पाटील,उपविभागीय कृषी अधिकारी मा. बापूसाहेब गावित, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमांमध्ये महसूल विभागातर्फे आदिवासी भागातील लाभार्थ्यांना विविध दाखले, रेशन कार्ड,विविध लाभाच्या योजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध यंत्र अवजारांचे वाटप करण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने पौष्टिक तृणधान्यांच्या जनजागृतीसाठी राजगिरा लाडूचे वाटपही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तहसिलदार साहेबराव सोनवणे,अपर तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे,गटविकास अधिकारी अधिकारी, मुख्याधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी यांचे समावेतच तालुक्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व क्षेत्रीय कर्मचारी, परिसरातील पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध