Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

आमोदे येथील शेतकऱ्याला विजेचा शॉक लागून मृत्यु......



तरुण गर्जना प्रतिनिधी :-
अमळनेर तालुक्यातील आमोदे येथील 36 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना काल 4.तारीख.. दुपारी दोन च्यां सुमारास घडली.. कैलास भालेराव पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे..कैलाश पाटील. हे काल दुपारी आपल्या शेतात कपाशीची पाहणी करण्यासाठी गेले असता..त्यांच्या शेतात विजेचा खांब्याला ताण दिलेल्या तारेला स्पर्श झाले असता त्यांना करंट लागुन त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला..ही घटना कैलाश पाटील यांचे चुलत भाऊ नंदलाल.व चदलाल यांना लक्षात आली असता त्यांनी एकमेकांच्या मदतीने कैलास ला अमळनेर ग्रामीण आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले.ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली व गावावर शोककळा पसरली.कैलाश पाटील यांचे पश्यात आई.वडील.दोन मुले. बायको असा परिवार आहे. 

अमळनेर पो.स्टे.मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास अमळनेर पो.स्टे.चे.अधिकारी करतं आहे.एम.एस.ई.बी.च्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

मयत शेतकरी कैलास पाटील यांचा परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.आज 5 रोजी अमोदे गावातील गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात कैलास पाटील यांच्या वर अत्यविधी करण्यात आली असून गावातील सरपंच सौ रजनीबाई सुरेश पाटील.उपसरपंच.ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध