Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
प्रिय पप्पा, Dr Vijaykumar Gavit आज तुमचा 68वा वाढदिवस!! नंदुरबार शहरात कालपासूनच तुमच्या वाढदिवसाची आणि स्वातंत्र्यदिनाचीही लगबग सुरू...!
प्रिय पप्पा, Dr Vijaykumar Gavit आज तुमचा 68वा वाढदिवस!! नंदुरबार शहरात कालपासूनच तुमच्या वाढदिवसाची आणि स्वातंत्र्यदिनाचीही लगबग सुरू...!
आज तुमचा वाढदिवस साजरा करत असताना खूप वेगवेगळ्या आठवणी मनात दाटून येत आहेत. लहानपणापासून खूप वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला बघत आले.
आदिवासी समाजातला एक तरुण तडफदार डॉक्टर ज्याने आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत आपली मोहर उठवलीच होती पण नंतरही रुग्णप्रिय म्हणून तुम्ही जिथे काम केलं तिथे लौकिक प्राप्त केला. रुग्णसेवा करताना समाजसेवा घडतच होती पण तरीही एक अस्वस्थता तुमच्यात कायम असायची. यापेक्षा अधिक आदिवासी समाजासाठी,वर्षानुवर्ष मागास म्हणून लेबल लागलेल्या नंदुरबारसाठी आणि नंदुरबारच्या लोकांसाठी मला काय करता येईल ?? त्यातूनच राजकारणात येऊन, तुमच्या झंझावाती कामातून पुढे जात जात तुम्ही आज आदिवासी विकास मंत्री ही महाराष्ट्र राज्यातली महत्त्वाची जबाबदारी सांभाळता आहात.
अतिशय शांत, सगळ्यांना धरून चालण्याचा स्वभाव, कोणालाही न दुखवता त्याच्याकडून काम करून घेण्याची हातोटी आणि प्रचंड जनसंपर्क यामुळे आज तुम्ही नंदुरबार मधले सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरलायात. लोक कौतुकाने जेव्हा तुम्हाला नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि विकासपुरुष म्हणतात तेव्हा माझा उर अभिमानाने भरून येतो.
तुमच्या पावलावर पाऊल ठेवत माझ्या इच्छेसाठी मी राजकारणात आले. पण त्याआधी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची मोलाची सूचना तुम्ही मला केली होती.आजवर राजकारण, समाजकारण, माझा मतदारसंघ,माझा आदिवासी समाज यांच्यासाठी मला जे काही करता आलं त्या सगळ्याचे प्रेरणास्त्रोत आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तुम्हीच आहात.
तुमच्यात मी एकाच वेळी किती वेगवेगळी व्यक्तिमत्व बघते....तेव्हा, तुम्हाला हे कसं शक्य होतं? याचं आश्चर्य वाटत राहतं...आमच्यासाठी तुम्ही आदर्श पिता आहात,आईसाठी तुम्ही आदर्श पती आहात, आजी आजोबांसाठी तुम्ही आदर्श पुत्र होतात आणि नंदुरबारकरांसाठी आदर्श नेते आहात...प्रत्येक भूमिका चोक बजावत असताना प्रत्येक पायरीवर तुम्हाला कसली ना कसली आहुती द्यावी लागली...पण त्याचं तुम्ही कधीही भांडवल केलं नाही...'कुछ पाना है तो कुछ खोना होगा' हे तुमच्या जीवनाचं सरळ सूत्र आहे...आजही माझ्यापेक्षा अधिक उत्साहाने तुम्ही कार्यक्रम उपक्रमात सहभागी होता तेव्हा अजून तुमच्याकडून शिकायचं खूप बाकी आहे याची सतत जाणीव होत राहते.
मध्यंतरी डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर मुंबईच्या शासकीय निवासस्थानी तुम्ही असताना तिथे तुम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांची अखंड रीघ लागली होती...त्यावेळी मुलगी म्हणून मला त्याचा थोडा त्रास वाटला खरा...पण येणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याला, नागरिकाला ज्या आपुलकीने भेटून तुम्ही त्यांचीच चौकशी करत होता, त्यावेळी तुमच्या लोकप्रियतेचं कारण मला नव्याने कळलं.
आज आयुष्यात तुम्ही खरोखर कृतार्थ आहात.आणि अजूनही नंदुरबार च्या विकासाचा ध्यास सदैव तुमच्या मनात असतो.तुमची लोकसेवेची समाजसेवेची पालखी मी आणि सुप्रिया दोघीही पुढे नक्कीच देऊ आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम कायमच करत राहू...तुमचे आशीर्वाद मात्र या सगळ्यात अखंड आमच्या डोक्यावर असू द्या. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा !!
-तुमची हिनाताई
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा