Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
रा.खत विक्रेत्यानेच बनावट खत वितरणाची दिली कबुली ? कृषी विभागाकडून कारवाईस विलंब का ? सोनगीर कृषी सेवा केंद्र तपासणी प्रकरण...
रा.खत विक्रेत्यानेच बनावट खत वितरणाची दिली कबुली ? कृषी विभागाकडून कारवाईस विलंब का ? सोनगीर कृषी सेवा केंद्र तपासणी प्रकरण...
धुळे - परवाना नसलेल्या भूमी क्रॉप सायन्स या बनावट खतांच्या कंपनीतून होलसेल वितरकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी खत साठा विक्रीसाठी गेल्याचे एमआयडीसीतील बनावट खत कारवाई प्रकरणी चौकशीत निष्पन्न झाल्याने कृषीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून सोनगीर येथील लक्ष्मी ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राची काही दिवसांपूर्वीच तपासणी करण्यात आली आहे. त्यात त्रुटया आढळल्याने संबंधित होलसेल वितरकाला नोटीस बजावण्यात आली असून त्याला दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोन दिवसात खुलासा सादर झाल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन तपासांती गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र त्या तपासणीत नेमकं काय निष्पन्न झालं ? तपासणीत काय आढळून आलं ? आठ दिवस उलटूनही याची माहिती समोर न आल्याने गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या तपासणी विषयी उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
या तपासणी प्रकरणी लक्ष्मी ट्रेडर्सच्या संचालकांना विचारणा केली असता स्वतः संचालकांनीच परवाना नसलेल्या भूमी क्रॉप सायन्स कंपनीचे बनावट खत माझ्या माध्यमातून इतर कृषी सेवा केंद्रांना वितरित केल्याची कबुली दिली आहे. स्वतः होलसेल वितरकाने माहिती देऊनही त्याच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याने कृषी च्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कारभाराविषयी विविध प्रश्न उपस्थित होत आहे. आठ दिवस उलटूनही संबंधित होलसेल वितरकाला अभय देण्याचा प्रकार संबंधित यंत्रणेकडून होतोय का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी संबंधीत दुकानदाराकडे पथकाने तपासणी केली त्यावरून नोटीस मिळाली होती.काही त्रुट्या आढळल्या त्याचे उत्तर दिले आहे.औद्दोगीक क्षेत्रात आढळलेल्या खत साठा पैकी आमच्याकडे कोणतेही खत नव्हते.मात्र हे खत माझ्यामार्फत तालुक्यातील इतर दुकानदारांना परस्पर खत पाठवले.खत कंपनीकडून आमची फसवणूक झाल्याने सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.नंदकुमार चौधरी, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र सोनगीर.ता.जि.धुळे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

खत विक्रेते वितरक यांना माहीत असूनही शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि कृषी विभागाने सर्व खत विक्रेते यांना ही उत्पादक कंपन्या बरोबर जबाबदार ठरवत सर्वावर गुन्हा नोंद करणे योग्य होईल कारण शेतकरी फसवणूक ही टाळता येईल अशा विक्रेते वितरक यांचे खत लायसेन्स रद्द करून त्यांचे सहभाग शिवाय असे प्रकार होत नाहीत
उत्तर द्याहटवा