Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३
नंदुरबार पंचायत समिती येथील दोन कनिष्ठ सहाय्यकांवर एसीबीची धडक कारवाई....
तक्रारदार लोकसेवक असून सुद्धा त्यांची सातारा नंदुरबार अशी अंतर जिल्हा बदली झाल्यानंतर त्यांचे पगार वाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक ०१) दादाभाई पान पाटील व आलोसे क्रमांक ०२) सुखदेव वाघ कनिष्ठ सहायक पंचायत समिती नंदुरबार यांनी आज ०८ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रारदार कडून हजार ते दोन हजार मोघम स्वरूपात लाचेची मागणी केली. त्यानंतर एसीबीच्या सापळा कारवाही दरम्यान मागणी केलेली लाचेची रक्कम पंचायत समिती आवारातील स्वीकारल्यानंतर त्यांना पंच व साक्षीदारसमक्ष पकडण्यात आले तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, श्री.माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक, श्री.नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी पोलीस उप अधीक्षक, सापळा अधिकारी समाधान वाघ,
सापळा कार्यवाही पथक पोहवा/विजय ठाकरे,पोना/देवराम गावित,पोना/संदीप नावाडेकर,पोना/अमोल मराठे व पोना/मनोज अहिरे सर्व नेम ला.प्र.वि. नंदुरबार सापळा मदत पथक माधवी एस.वाघ पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नंदुरबार पोहवा/विलास पाटील व मपोना/ज्योती पाटील सर्व नेम अँटी करप्शन ब्युरो,नंदुरबार यांच्या पथाकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा