Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
पालकांच्या सांभाळ न करणाऱ्या वारसांच्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद न करण्याचा ठराव...! शिरपूर तालुक्यातील हिसाळे ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम...!
पालकांच्या सांभाळ न करणाऱ्या वारसांच्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद न करण्याचा ठराव...! शिरपूर तालुक्यातील हिसाळे ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम...!
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत हीसाळे यांनी दिनांक 7 ऑगस्ट रोजी घेतलेल्या ग्रामसभेत एक अनोखा असा ठराव पारित केला असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची सर्वसामाजिक स्तरावरून अभिनंदन व समर्थन होत आहे.
ग्रामपंचायत या संस्थेला ग्रामीण विकासाच्या प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. या संस्थेच्या माध्यमातूनच ग्रामीण विकासाच्या व सामाजिक समतोल हा साधला जात असतो. त्यात एक पाऊल पुढे जाऊन सामाजिक जबाबदारी व भान ठेवत शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत हिसाळे यांनी असा ठराव पारित केला आहे की आपल्या गाव परिसरात वृद्धपालकांच्या सांभाळ न करणाऱ्या वारसांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी न घेण्याबाबत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे.
गावातील काही वरिष्ठ नागरिकांना व ग्रामपंचायत सदस्य यांना असे दिसून आले होते की बरीच मुले आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. म्हातारपणी आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना घराबाहेर काढतात त्यांच्या उतार वयात त्यांच्या आजारपणाची सेवा न करता व त्यांना आर्थिक मदत न करता पूर्णता त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.ज्या आई-वडिलांनी अपार कष्ट करून मुलांच्या सांभाळ केला त्यांना हे जग दाखवले मात्र त्यांची गरज संपल्यानंतर त्यांच्याकडून सर्व ऐश्वर्य उपभोगून घेतल्यावर काही आपत्यांना जन्मदात्यांची काळजी वाटत नाही. सामाजिक व नैतिक दृष्ट्या हे अत्यंत चुकीचे व मानवतेला काळी माफ असणारे असे आहे.या गोष्टीला विरोध व यातून काहीतरी सामाजिक बदल घडावा या शुद्ध हेतूने ग्रामपंचायत हीसाळे यांनी असा ठराव पारित केला आहे की आपल्या गावात जे अपत्य आई-वडिलांच्या सांभाळ करणार नाहीत अशा कोणत्याही आपत्यांना आई-वडिलांच्या संपत्तीवर वारस होता येणार नाही व ग्रामपंचायत मार्फत तशी नोंद देखील घेतली जाणार नाही. असा ठराव पारित केला आहे.
दिनांक सात रोजी ग्रामपंचायत हिसाळे कार्यालयात उपसरपंच श्रीमती स्वाती विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या ठरावासाठी सूचक म्हणून विकास गुलाबराव पाटील यांनी काम पाहिले तर अनुमोदन श्री भास्कर तानू गायकवाड यांनी केले.सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या ठरावाला मान्यता दिली व ग्रामस्थ यांनी देखील या ठरावाचे स्वागत केले आहे.
यावेळी माजी उपसभापती संजय पाटील,विकास पाटील ग्रा.प.सदस्य भास्कर गायकवाड सौ.छाया पाटील, प्रमिलाबाई भील,राजू भील ,विश्वास देवरे,प्रदीप पाटील, संतोष पावरा, वांगर्या पावरा,दुधा जाधव निंबा शिपी, भीमराव पाटील ,नरेंद्र पाटील,
कांतीलाल लोहार ,शलिक बापू पाटील,अर्जुन पाटील ,शालीक कोळी राहुल पवार यांच्या सह ज्येष्ठ नागरिक, ग्रामसेवक कुवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा