Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तहसीलदारांना सर्वपक्षीय निवेदन...!भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथील चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण हत्येच्या निषेधार्थ...
शिरपुर तहसीलदारांना सर्वपक्षीय निवेदन...!भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथील चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण हत्येच्या निषेधार्थ...
शिरपूर प्रतिनिधी :-भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथील चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण हत्येच्या निषेधार्थ शिरपुर तहसीलदारांना शिरपुर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यातर्फे निवेदन देत आरोपींना फाशीची शिक्षेसह विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी देण्यात आले.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या म्हटले आहे की,भडगांव तालुक्यातील गोंडगांव येथील 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण खुन करण्यात आल्याची अमानवीय घटना उघडकीस आली असून याप्रकरणी भडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र आरोपी व त्याला सहकार्य करणाऱ्यासह आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करीत सदर घटनेचा निषेध व्यक्त करून पीडित बालिकेच्या मारेकऱ्यांची सी.आयडी.
मार्फत चौकशी करीत समितीवर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्त करावी.सदर घटनेचा जलद गती न्यायालयात केस चालविण्यात यावी यासाठी विधीतज्ञ ऍडव्होकेट डॉ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच न्यायालयीन खर्च शासनाने करावा अशा व आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी लहान बालिकेंच्या हस्ते स्वीकारले. याप्रसंगी शहर व तालुक्यातील राजकिय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे सामाजिक कार्यकर्त्यासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा