Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अनेक वर्षापासून बंद असलेली आदिवासी दीनदयाळ सह.सूत गिरणी आ.मंजुळा गावित यांचा प्रयत्नाने चालू होण्याचा मार्गावर



पिंपळनेर येथील आदिवासी दिनदयाळ सहकारी सुत गिरणी पिंपळनेर, सुरू करण्यासंदर्भात आमदार सौ मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांच्या निवासस्थानी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.या वेळी सुत गिरणीचे चेअरमन श्री. उदय गोविंदराव चौधरी ,व्हाईस चेअरमन श्री.डॉ. तुळशीरामजी गावित ,संचालिका सौ. मंजुळाताई गावीत ,संचालक श्री.अनिल बागुल ,संचालक श्री भूपेंद्र जाधव ,श्री. योगेश बिरारिस ,श्री दिपक भामरे ,श्री. संजयजी मराठे ,श्री.साईराम भाऊ अहिरे , श्री .मुरलीधर तात्या ,श्री.सखाराम दादा , श्री.पवार सर ,‌सुती गिरणी चे ( MD) श्री. भगवान भामरे.उपस्थित होते सकारात्मक चर्चा झाली .आदिवासींसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरच सुरू करणार अशा भावना आमदार सौ.मंजुळाताई गावित आणि डॉ.तुळशीरामजी गावित व्यक्त केल्या.साक्री तालुक्यातील ही सूत गिरणी चालू झाल्यामुळे अनेक युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे आणि तालुक्यातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे तरी या निर्णयामुळे आ.मंजुळा गावित यांचे तालुक्यातील जनतेकडून असणाऱ्या अपेक्षा निश्चितच पने पूर्ण करण्याचा अपेक्षा लागून आहेत.साक्री तालुक्यातील पांझरा कांन सहकारी साखर कारखाना देखील चालू करणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साठी खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यावरही आमदार महोदयांनी लक्ष देणे गरजेचे आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध