Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ सप्टेंबर, २०२३
पोलिस देखील माणुसंच ; पण टार्गेट मात्र पोलीसच का ?
पोलिस देखील माणसं आहेत, त्यांच्या घरी देखील त्यांची लेकरं बाळं वाट पाहत असतात. गर्दीत आपण दिसून येत नाहीत, गर्दीत कुणाला काय समजतं याच्या हिमतीवर सहज पोलिसांना टार्गेट करुन दगड फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात. लाखो करोडोचे सहजच नुकसान केले जाते. कुणाचा काय राजकीय/सामाजिक किंवा आणखी कोणता हेतू असेल अशा घटनांमध्ये. पण टार्गेट मात्र पोलीसच होतात.काही केलं नाही म्हणून देखील कारवाई आणि काही केलं म्हणून पण कारवाई. पोलीस देखील माणसं आहेत, कुठून दुसऱ्या ग्रहावरुन आलेले असंवेदनशील परग्रही नाहीत.ते कधीच उगीचच कोणाला लाठी मारत नाहीत.फारच गळ्यावर आल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून लाठीचार्ज केला जातो. त्याआधी कित्येक वेळा हाता - पाया पडून समजावलं जातं. वारंवार विनवण्या केल्या जातात. एवढं होऊनही पब्लिक मधून दगडफेक केल्यानंतरही हात जोडून विनवण्याच केल्या जातात. मग शेवटी आपलंच मरण दिसायला लागल्यावर शेवटचा पर्याय वापरला जातो. पोलीस घाबरतात म्हणून विनवण्या करतात असं नाही.
त्यांना पण लोकांची काळजी असतेच, जर शांततेत मिटलं नाही तर त्याचे पुढे किती गंभीर परिणाम होतील याची जाणीव पोलिसांना असते.सामाजिक प्रॉब्लेम तर होतोच.परंतु घटनेनंतर राजकीय विरोधक मग कोणत्याही पक्षाचे असो ते राजकीय पोळी शेकण्यापोटी आरडाओरड करणारच आणि कारवाईचा बडगा पोलिसांवरच येणार याची देखील जाणीव त्यांना असते.दंगलीत रस्त्यावर लोक दगड मारतात, ते झालं की कुणाला तरी शांत किंवा खुश करण्यासाठी पोलिसांवर कारवाई केली जाते. चौकश्या/बदल्या /सस्पेंड आणि इतर कारवाया....म्हणजे दुहेरी पेचात अडकतो तो फक्त पोलीसच....त्यामुळे पोलिसांना देखील समजून घ्या.... त्यांच्यावर उगीचच कारवाया केल्या तर त्यांची काम करण्याची हिम्मत तुटेल, काम करताना मनात भीतीच असेल....असंच चाललं तर सर्वच अवघड होऊन बसेल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा