Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

बँक ऑफ बडोदा मधील ग्राहकासाठी लागणारे फॉर्म मराठी भाषेत उपलब्ध होणे बाबत शिरपूर तालुका मनसेकडून निवेदन




शिरपूर प्रतिनिधी :- जास्तीत जास्त लोकांची आर्थिक व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकांना मार्फत होत असल्याने या ठिकाणी खाते उघडणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते मात्र या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेले सर्व फॉर्म हे इंग्रजी व हिंदी भाषेत असतात त्यामुळे बऱ्याचश्या ग्रामीण लोकांना तो फार्म भरण्यासाठी शंभर पन्नास रुपये खर्च करून दुसऱ्याच्या कडून भरून घ्यावा लागतो खरे पाहिले तर महाराष्ट्र मधील सर्वच शासकीय कार्यालयात बँकांमध्ये मराठी भाषेतच कामकाज चालवण्यासाठी कोणीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. ते केवळ फक्त मनसे मार्फत होत 

आहे ग्रामीण भागातील मजूर, कष्टकरी व शेतकरी यांना तोडके मुडके मराठी लिहिता येते. अशा लोकांच्या भावना व त्यांची मते समजून घेत तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी बँक ऑफ बडोदा या ठिकाणी मराठी भाषेतील फॉर्म ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठी शिरपूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या शाखाधिकारी यांना निवेदन दिले. त्यावेळी शाखाधिकारी यांनी तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी मांडलेल्या समस्यांबाबत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत याबाबत आमच्या स्तरावर आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. असे आश्वासन दिले.

याबाबत ग्रामीण व आदिवासी भागातून मनसे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे यांचे बारीक-सारीक गोष्टीकडे असलेल्या लक्ष यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे
निवेदन देतेवेळी धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिराळे, तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, शहराध्यक्ष पंकज मराठे, मनविसे धुळे उपाध्यक्ष सोनू राजपूत, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, तालुका सहसचिव सुनील जाधव, मनसे महिला सेना तालुका अध्यक्ष लताताई माळी, तालुका उपाध्यक्ष अमोल गुजर प्रवीण गुरव, वसंत कोळी, राज मोरे, पवन माळी, व आधी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध