Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
पत्रकाराला शिवीगाळ करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करा - धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघा कडून एस.पी.याना निवेदन.....
पत्रकाराला शिवीगाळ करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करा - धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघा कडून एस.पी.याना निवेदन.....
धुळे - पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात गून्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची ठरत असते.पत्रकार समाजाचा आरसा असून चुकीच्या व समाज व्यवस्थेला घातक ठरणाऱ्या बाबी प्रसार माध्यमे उघडकीस आणतात. म्हणून पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. पत्रकारितेचा चौथा स्तंभ असलेल्या वारसदाराला लोकप्रतिनिधी अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ लोकशाही व माध्यमांचा अपमान करणारी आहे.त्यामुळे आमदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील,मिलिंद बैसाणे,रवींद्र इंगळे, कोषाध्यक्ष अतुल पाटील,कोषाध्यक्ष तुषार बाफना,सचिव सचिन बागुल,गणेश पवार,सदस्य मोहन मोरे,सुनील चौधरी,मनोहर सोलंकी,
सुनील निकम,पवन मराठे, सुनील बैसाणे,नागिंद मोरे,किशोर पाटील,जॉनी पवार,सिद्धार्थ मोरे, पुरुषोत्तम गरुड, जमिल शाह,धनंजय दीक्षित,प्रकाश शिरसाट,दीपक शिंदे,आकाश
सोनवणे,गोरख गर्दे,संजय पाटील,यांच्या सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा