Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

पिंपळनेर वन विभागातील अधिकाऱ्यांची अतिक्रमणधारक शेतकऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ. पिंपळनेर परिक्षेत्रातील वनपालांची भूमिका संशयास्पद



साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांनी वेळो वेळी अतिक्रमणाबाबत संबंधित वन विभागाला तक्रार करून देखील वनविभागाने कारवाई करण्याची धाडस दाखवले नाही त्यामुळे आज सुमारे दीडशे  ते दोनशे पश्चिम पट्ट्यातील शेतकरी यांनी थेट पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर घेराव घालून आंदोलन केले
पिंपळनेर वन क्षेत्रातील पिंपळनेर परिमंडळातील रोपवनात व राखीव वनात अवैद्य अतिक्रमण करण्यास मदत करणाऱ्या वनपाल पिंपळनेर यांच्या कृष्ण कृत्याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते व वृक्ष प्रेमी यांच्या कडुन उपवनसंरक्षक ( प्रा) धुळे यांच्याकडे करण्यात आली
पिंपळनेर वनक्षेत्रात, पिंपळनेर परिमंडळात मौजे मल्याचापाडा कंपा.क्र.३७७ ,३७८व ३७९  यात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत क्षेत्र.२५ हेक्टर २५ हेक्टर यात सन २०१९च्या पावसाळ्यात रोपवन घेऊन खड्डे खोदकाम,बुजाई ,रोप लागवड, प्रथम निदंणी द्वितीय निदंणी,तुतीय निदंणी,औषधे फवारणी खते देणे,रोपवन संरक्षण खर्च इत्यादी करिता लाखो रुपयाचा आज पर्यंत खर्च केला जात आहे.
अशी सर्व वस्तुस्थिती असताना, वनपाल पिंपळनेर यांनी मौजे मल्याचापाडा भाईंदर येथील अतिक्रमणधारकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोडजोड करून,मौजे मल्याचापाडा येथील क्षेत्र २५ हेक्टर क्षेत्र २५ हेक्टर या रोपवनात व इतर राखीव वनातील मोठी झाडे तोडून तेथे नांगरटी व वखरटी करून पीक पेरा करून मोठ्या प्रमाणावर अवैद्य अतिक्रमण केले आहे व केले जात आहे सन २०१९ते आज पर्यंत सदर रोपवनात लाखो रुपयाचा केलेला खर्च वाया गेला आहे 
स्वतःच्या आर्थिक फायदा करता वनपाल पिंपळनेर यांनी सुपीक मौल्यवान वन जमीन व रोपवने अक्षरशः विक्रीस काढले आहेत. वनपाल पिंपळनेर हे स्वयंघोषित अध्यक्ष असून त्यांचा कारभार अत्यंत मनमानी ने सुरु आहे. पिंपळनेर परिमंडळात कळमबारी जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून, येथे अवैध अतिक्रमण होत आहे. तसेच उमरपाटा नियत क्षेत्रात मळगाव नियक्षेत्रात ही मोठ्या प्रमाणावर अवैद्य अतिक्रमण झालेले आहे.
आरगिरणीधारक लाकुड व्यावसायिकां कडून मोठे हप्ते सुरु आहेत.रीतसर मालकी प्रकरण न करता केवळ इंट्री घेऊन आंबा, मोहा ,निंब, सागवान लाकडांची वाहतुक होत आहे.वनपाल पिंपळनेर हे स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास वरीष्ठ वनअधिकारी घाबरतात तरी प्रस्तुत अर्जाची सविस्तर चौकशी होऊन पिंपळनेर परिमंडळातील, मौजे मल्याचापाडा भाईंदर येथील तृतीय वर्षीय रोपवन चे राखीव वनातील झालेल्या रोपवन नुकसानीतील व जंगल नुकसानीची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणीही वन कर्मचारी शासकीय वनसंपदा विकण्याची हिंमत करणार नाहीत.असे तक्रारीचे निवेदन देण्यात आले.परंतु आता तरी संबंधित वन विभागातील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? असे नागरिकांमधून बोलले जात आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध