Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३
सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !
चोपडा (प्रतिनिधी) पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.शिवाजी ढंगू बाविस्कर असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्तावर त्यांची मोटार सायकल अडवून थांबवले होते.तुमच्या जवळ गांजा आहे असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे त्यांना सांगण्यात आले होते. सांगितले.तुमच्याजवळ गांजा असून तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची आहे.जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले होते.
तक्रारदार यांचे नातेवाईकाकडून रात्री 30 हजार रुपये घेतले व मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली. जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला उर्वरीत 20 हजार रुपये आम्हाला दयावे लागतीत असे सांगितले. त्यानंतर दि 24 ऑगस्ट रोजी गांजाची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली व तळजोडअंती १५ रुपये पंचासमक्ष बाविस्कर याने लाचेची मागणी करून स्वतः स्विकारतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी सापळा रचला !
पोलीस अधिक्षक नाशिक श्रीमती शर्मिला घारगे - वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक,स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने यांनी केली कारवाई मदत पथक - एन.एन.जाधव पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील,पो.ह. रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन,पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ. अमोल सुर्यवंशी,पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.सचिन चाटे आदिंनी काम पाहिले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा