Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर शहराचे देवदूत...! आदरणीय भूपेशभाई पटेल म्हणजे समर्पण,सेवा,दूरदृष्टी,कार्यक्षम नेतृत्व,
शिरपुर शहराचे देवदूत...! आदरणीय भूपेशभाई पटेल म्हणजे समर्पण,सेवा,दूरदृष्टी,कार्यक्षम नेतृत्व,
आदरणीय भूपेशभाई पटेल म्हणजे समर्पण,सेवा,दूरदृष्टी,कार्यक्षम नेतृत्व,समर्पणाच दूसरं नाव.आपला शिरपुर तालुका खरच भाग्यशाली आहे ज्यात भूपेशभाई पटेल सारखे नेतृत्व मिळाले.पटेल कुटुंबाने शिरपुर तालुक्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात शिरपुर तालुक्याची आगळी,वेगळी ओळख निर्माण झाली आहे.आदरणीय अमरिशभाई पटेल साहेबांनी खूप मोठमोठे उदयोग व शिक्षणाचे माहेरघर शिरपुरला बनवले आहे.त्यासाठी त्यांना भूपेशभाई पटेल यांची भक्कम साथ मिळाली. आहे.
आदरणीय भूपेशभाई पटेल म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व.अनेक रूग्णांना त्यांनी आॅपरेशनसाठी मदत केली आहे.त्यांच्याकडे कुणीही मदतीला जावो.ते नेहमी कुणालाही मदत करायला तयार असतात.शिरपुर तालुक्यावर कोणतेही संकट येवो आदरणीय भूपेशभाई पटेल त्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतात. ते शिरपुर तालुक्याला आपले कुटुंब मानतात व कुटुंबप्रमुखाप्रमाणे काळजीही घेतात.भाईसाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शिरपुर नगरपालिकेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.तरूणांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात त्यांचे अनमोल योगदान आहे.आज दूर-दूरून विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी शिरपुरात येत आहे.शिरपुरला पाणी,रस्ते ,शिक्षण या सर्वांमध्ये नंबरवन बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
भूपेशभाईंसाहेबांनी विचार केला तर ते कोणत्याही मेट्रो सिटीत जाऊन आयुष्य जगू शकतील ,राजकारणात सहभागी होऊ शकतील.पण भाईसाहेबांनी शिरपुरलाच आपली कर्मभूमि मानले आहे.शिरपुर शहरासह ग्रामीण भागाकडेही त्यांचे विशेष लक्ष असतं.
शिरपुरला पर्यावरणाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी शिरपुरला वृक्षारोपणाचे कार्यही भूपेशभाईंसाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे सुरू असतं.आज त्यांचा वाढदिवस.आमच्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! राजेंद्र लोटन पाटील वनावल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा