Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतील घडलेल्या गैरव्यहराबाबत स्वंतत्र चौकशीच्या मागणीस विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या होकार !
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतील घडलेल्या गैरव्यहराबाबत स्वंतत्र चौकशीच्या मागणीस विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या होकार !
तरुण गर्जनाचे संपादक यांनी घेतली विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांची भेट व कार्यालयीन कर्मचा-याशी चर्चा व पाठपुरावा…!
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.धुळे या बॅकेतील तळोदा शाखेतील घोटाळा, शिरपूर तालुक्यातील बचत गट घोटाळा व शिरपूर तालुक्यातील बभळाज शाखेतील घोटाळा ही सर्व घोटाळ्यांचे प्रकरण पाहिले, तर आजपावतो कोणत्याही बॅक कर्मचा-यांवर फ़ौजदारी स्वरुपाचा गुन्हा बॅकेच्या कर्मचा-यावर दाखल केलेला नाही.आणि म्हणूनच आपल्या मोरक्याच आपल्याबरोबर असल्याने बॅक कर्मचारी बिनधास्तपणे मनमानीपणे आपले कामकाज करतात.व आम्ही आपणास दिलेल्या शब्दानुसार बॅकेतील घोटाळ्यांची मालिकाच सरळ-सरळ सुरु करुन एकामागून एक सर्व घोटाळ्याचे सविस्तर वृत्त सहपुराव्यासह सादर करणार असल्याचे आम्ही म्हटलेले होते. त्यानुसार आम्ही वरील घोटाळ्यांची चौकशी होणेकामी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यावर नेहमीप्रमाणे अर्जाचे हस्तांतरण झाले व तेथून उत्तर आले. उत्तरातील मजेदार शब्द म्हणजे अंतर्गत चौकशीत दोषी आढलेल्या कर्मचा-यांवर प्रशासकिय कारवाई करण्यात येत आहे. दोषी आढळलेल्या कर्मचा-यांची आर्थिक तोशिस म्हणून त्यांची वार्षिक वेतनवाढ स्थगित ठेवून त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे.
याचाच अर्थ बॅकेच्या वरिष्ठ अधिक-यांनी बॅकेत घोटाळे घडलेत हे मान्य केले. मग केवळ प्रशासकिय कारवाईच का? फ़ौजदारी स्वरुपाचा गुन्हा का दाखल करत नाहीत? नेमकी प्रशासकिय कारवाई कोणत्या प्रकरणात केली जाते व फ़ौजदारी कोणत्या प्रकरणात केली जाते ? याचा तरी एकवेळ परिपुर्ण अभ्यास करावा. अशी ही बाब आहे. कामकाजातील गलथानपणा, दप्तरी चुका, वेळेचा व पदाचा दुरुपयोग (आर्थिक व्यवहार सोडून), बेशिस्तपणा हे प्रकारणात केली जाते ती प्रशासकिय कारवाई. व पैश्याचा स्वरुपातील कोणत्याही प्रकारची केलेली हेराफ़ेरी, वेळेचा व पदाचा दुरुपयोग (आर्थिक व्यवहारांबाबत), गैरव्यवहार, अपहार व घोटाळा हे प्रकरंणात केली जाते ती फ़ौजदारी स्वरुपाची कारवाई. आणि म्हणुन बॅक कोठेतरी आपल्या कर्मचा-यांना पाठीशी घालत असल्याने शेवटी विभागीय सहनिबंधक नाशिक विभाग नाशिक यांचे कार्यालय गाठले. व बॅकेने दिलेले उत्तर आम्हाला अमान्य असून त्यांनी आपल्या कर्मचा-यांचा बचाव करत पाठीशी घातलेले असल्याने ते आम्हास अमान्य असून त्याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी केल्याने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी चौकशी करण्याचे सध्यातरी मान्य केले आहे. असे असले तरी याबाबतचा सततचा पाठपुरावा हा कायम ठेवून, चौकशीकामी आवश्यक तसे सबळ पुरावे उपलब्ध होणेकामी, आवश्यक ते सर्व मार्गानी सनदशिरपणे प्रयन्त केला जाईल. व आमच्याकडील सर्वच पुरावे चौकशी अधिकारी यांना पुरवण्यात येतील.
(वाचा सविस्तर पुढील अंकात….क्रमशा)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा