Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी...! गावठी बनावटीची साडेचार फुट रायफल संशयित आरोपीकडून जप्त....!



चोपडा प्रतिनिधी :- चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गलवाडे ते बुधगाव जवळ गावठी बनावटीची साडेचार फुट रायफल संशयित आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.

दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोघावर संशय आला. दोघांना थांबविण्यासाठी हटकले असता मोटारसायकलच्या मागच्या सिटवर बसलेल्या कांतीलाल दुरसिंग पावरा (रा.महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि.धुळे) याने पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा पळ काढला.दुसरा संशयित आरोपी रमेश मालसिंग पावरा (वय ३३ रा महादेव दोंदवाडे ता शिरपुर
जि धुळे) त्याचा जवळ गावठी बनावटीची रायफल हे प्राणघातक अग्नीशस्त्र आहे,हे माहीत असताना देखील विना परवाना स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगतांना मिळून आला.पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयित आरोपीकडून ८० हजार रुपयांची एक गावठी बनावटीची साडेचार फुट रायफल ड्रेगर लोखंडी, रायफल बट लाकडी आडीजात लाकडीचे व पितळी पट्ट्या लावलेले मिळून आली. तसेच ६० हजार किंमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची असा एकूण १ लाख ४० हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.डी वायएसपी ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पो.हे.कॉ.शिंगाणे,राकेश पाटील हे तपास करीत आहे.आरोपीने ही रायफल जवळपास 18 गुन्ह्यात वापरलेली आहे,असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.याप्रकरणी एका रोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध