Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी...!
महाराष्ट्र मधील सर्व आयोगात रिक्त जागा भरण्यात यावे मुख्यमंत्री साहेबांना माहिती अधिकार महासंघाची मागणी...!
महाराष्ट्र शासनाचे विविध आयोगामध्ये रिक्त जागा असून सदर जागावर योग्य उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्य कार्यकारणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतृत्व खाली माहिती अधिकार महासंघ जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून एका निवेदनाद्वारे नंदुरबार जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांना करण्यात आलेली आहे.
प्रशासकीय स्तरावरील यंत्रणेच्या अपुऱ्या मनुष्यबळ अभावी किंवा शासनाचे दुर्लक्ष मुळे सर्वसामान्य माणसाच्या अडचणी व सुविधांबाबत योग्य ती कारवाई होत नाही.
सर्वसामान्य माणसाला वेळीच योग्य तो न्याय मिळत नाही अशा प्रकारे प्रचंड रिक्त जागा असल्याने अप्रत्यक्षपणे राज्यांमध्ये अन्याय, अत्याचार, फसवणूक आणि भ्रष्टाचारामध्ये वाढ होताना दिसत आहे.
सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे वकील ठेवण्यासाठी पैसे नसतात असे नागरिक आपल्या साध्या भाषेमध्ये आपली तक्रार देतात व स्वतःच चालवत असतात.अनेकदा समाजातील जागरूक नागरिक आपल्या आजूबाजूला चुकीची,अप्रिय घटना घडत असेल तर माणुसकीच्या नात्याने तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर या प्रलंबित जागांमुळे अनेक वर्षे या तक्रारीचे दखलच घेतली जात नाही त्यामुळे समाजातील जागरूक,तत्पर नागरिक हाताश आणि निराश होऊ लागली आहेत.
शासनाप्रती नकारात्मक भावना निर्माण होत आहे तरी सर्व सामान्य माणसाला न्याय हक्कांसाठी, अधिकारांसाठी अधिकृत व्यक्ती उपलब्ध करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना सोबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयेश बागुल,कार्याध्यक्ष सईद कुरेशी, संपर्क प्रमुख महा.जितेंद्र भोई, जिल्हा प्रचार प्रमुख विशाल महाजन आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा