Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

तावखेडा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न...!



ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित,
वाल्मीकऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा ( प्र‌‌‌.न.) ता.शिंदखेडा जि धुळे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न.
गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास व संत वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम.पी.पी.महिरे-वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री एस एस पाटील ,राज्य आदर्श शिक्षक श्री.एन.पी.भिलाणे, ज्येष्ठ शिक्षक श्री सी. झेड कुवर, राज्य आदर्श कला शिक्षक श्री ए के सावंत, श्रीमती एम.डी. कुवर, श्री पी एच लांडगे, श्री एन व्ही पाटील यांची उपस्थिती लाभली होती.

विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे -वाघ यांनी गुरु -शिष्य परंपरा आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
राज्य आदर्श शिक्षक एन.पी.भिलाने यांनी शिष्यांनी गुरूं बद्दल व्यक्त करावयाची कृतज्ञता तसेच ज्यांच्यामुळे आपण घडलो असे आपले प्रथम गुरु आई वडील यांच्यासोबतच ज्यांच्यामुळे आपल्याला सन्मानाचे व आदराचे स्थान प्राप्त झाले त्या सर्व गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो.असे गुरुंबद्दल गुरूंचे महात्म्य त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पीपी महिरे वाघ यांचा सन्मान सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्र यांच्यातर्फे करण्यात आला.

त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचा सन्मान विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांच्यातर्फे मंगल पुष्पगुच्छ देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र राजपूत,श्री संजय कोळी,श्री चुडामन धनगर,श्री दिलीप पाटील यांनी मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध