Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा,मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध !! आमदारची पत्रकारांना शिविगाळ* *साक्री तालुक्यातुनही घटनेचा तीव्र निषेध
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा,मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध !! आमदारची पत्रकारांना शिविगाळ* *साक्री तालुक्यातुनही घटनेचा तीव्र निषेध
साक्री
पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गाव गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.यात संदीप महाजन हे जखमी झाले असून "आमदार किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार"महाजन यांनी पोलिसात केली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद,डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटलांच्या या मुजोरीचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून किशोर पाटील यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती.त्याचा मनात राग धरून आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती.ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते.या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती..मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची,सामंजस्याची भूमिका घेतली.तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती.संदीप महाजन आज रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असतांना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक पत्रकार महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो.येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली गेली.महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत.संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.
सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत.माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला आहे.पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.मुख्यमंत्र्यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख,धुळे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निवेदन देण्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा