Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
आधी शिवीगाळ,आता समर्थकांकडून मारहाण,पत्रकाराची बातमी झोंबली,शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी...!
आधी शिवीगाळ,आता समर्थकांकडून मारहाण,पत्रकाराची बातमी झोंबली,शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी...!
जळगाव प्रतिनिधी:- शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.
अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील व त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटलं होतं.
दरम्यान,आज (गुरूवारी) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली,असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं,असं पत्रकार महाजन म्हणाले.दरम्यान मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,"आधी मला शिव्या दिल्या गेल्या.
आता मला मारहाण झाली आहे.याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणाले होतो.मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही.आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय.मला व माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील"
जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे.या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली.ही बातमी किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली.किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली.एवढ्यावरच ते थांबले नाहीत,तर त्यांच्या समर्थकांकडून आज पत्रकार महाजन यांना मारहाणही केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा