Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुकास्तरीय महसूल सप्ताहाची मा.मंत्री अमरीश भाई पटेल व आमदारांच्या उपस्थित सप्ताहाची सांगता....
शिरपूर तालुकास्तरीय महसूल सप्ताहाची मा.मंत्री अमरीश भाई पटेल व आमदारांच्या उपस्थित सप्ताहाची सांगता....
शिरपूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने आदेशित केल्याप्रमाणे शिरपूर तालुक्यात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान शिरपूर तहसील कार्यालय शिरपूर यांच्याकडून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान महसूल प्रशासनाकडून तालुका भरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागरिकांनी विविध महसुली सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले होते.
या महसूल सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना महसुली सेवांचा लाभ देण्यात आला शिवाय इतर विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.अधिक अधिक लोकांपर्यंत महसुली सेवांचा लाभ देता यावा यासाठी सदरचे आयोजन शासनाने केलेले होते. या सर्व आयोजन अंतर्गत शासनाचे निकष नियम अटी शर्ती या सर्वांचे पालन करून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून करण्यात आला.
या सप्ताह दरम्यान महसूल विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत 1012 उत्पन्नाचे दाखले, 605 राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, 251 जात प्रमाणपत्र,437 नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, 358 रेशन कार्ड,32 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये दुरुस्ती आदेश ,395 महसूल आदालत फेरफार निर्गत,137 संजय गांधी निराधार अनुदान योजना, 202 श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, 147 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,107 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना,०४ इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना 43 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, o१ अनाथ प्रमाणपत्र अशा विविध योजना अंतर्गत पात्र गावात यांना लाभ देण्यात आले. या सप्ताहात एकूण 3731 लाभार्थ्यांना महसूल प्रशासनाकडून महसुली सेवांच्या लाभ देण्यात आला.
या सप्ताहाची सांगता दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा भंडारी सभागृह,शिरपूर येथे तालुकास्तरीय महसूल सप्ताह सांगता समारंभ आमदार अमरीश भाई पटेल अणि आमदार काशिराम पावरा सो यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.यावेळेस उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी,तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे राजगोपाल भंडारी,राव साहेब प्रभाकर चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आमदारांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा