Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांची आ. काशिराम पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी...!



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी अधिकाऱ्यांसह भारेटेक, पिंप्री व अनेक गावांची नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासन स्तरावरुन तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन देवून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा व धीर दिला आहे.

भोरटेक गाव व परिसरातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी करुन आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी तसेच भोरटेक गावासह परिसरातील अनेक पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेवून चर्चा केली. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी बांधव शासकिय लाभापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी गांभिर्याने अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच मच्छिंद्र जाधव, अशोक जाधव, जयवंत जाधव, मनोज पाटील, प्रदीप जाधव, सुभाष जाधव, भूषण जाधव, भुलेश्वर गोड,
रघुनाथ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
त्यानंतर पिंप्री गाव शिवारातील शेतामध्ये अनेक अंतर पायी फिरत शेतीपिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, पिंप्री सरपंच महेंद्रसिंग राजपूत, माजी सरपंच प्रविणसिंग राजपूत, आर. डी. पाटील, जयपालसिंह गिरासे, भटूसिंग पवार, किशोर पाटील, कोमलसिंग राजपूत, निंबा पाटील, भुरा गिरासे, नामदेव खैरनार, आनंद कोळी, भिला कोळी, मनोज राजपूत, धर्मेश राजपूत, आनंद भिल, गोटूसिंग राजपूत, रविंद्र पवार, रितेश राजपूत, पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेल्या शासकिय अहवालानुसार, शिरपूर तालुक्यातील जातोडा, बोरगाव, वनावल, रुदावली, बाळदे, साकवद, गिधाडे, उप्परपिंड, सावळदे, कुरखळी, पिंप्री, आढे, जैतपूर, बाभुळदे, खर्दे खु., पाथर्डे, भोरटेक, अंतुर्ली, लोंढरे, ममाणे, तऱ्हाडी, त.त., खामखेडा प्र.था, अंतुर्ली, जापोरा, पिळोदा, घोडसगाव, टेंभे बु. या 27 गावांमध्ये 770 शेतकरी बांधवांचे 669 हेक्टर क्षेत्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात केळी, कापूस, मका, तूर, बाजरी, टमाटे आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
या 27 गावांमध्ये, शेती शिवारात 16 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्रीपासून अतिवृष्टी व हातनूर धरणाचे पाणी सोडल्याने तापी नदीतील पाण्यात प्रचंड मोठी वाढ झाली होती. तसेच बॅक वॉटर चे पाणी वाढल्याने तापी काठावरील शेत शिवारात सुमारे पाच ते दहा फूट पाणी 24 तास पेक्षा जास्त काळ साचून राहिले. तापी काठावरील अनेक गावांमधील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध