Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करताना ट्रॅक्टर अडविल्याचा राग आल्याने महिला तलाठीच्या कानशिलात दगावल्याची घटना...!
अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करताना ट्रॅक्टर अडविल्याचा राग आल्याने महिला तलाठीच्या कानशिलात दगावल्याची घटना...!
धुळे प्रतिनिधी:- सविस्तर असे की, पांझरा नदीकिनारी नकाणे रोडवर महसूल पथकाकडून गस्त घातली जात होती. संशयित एका ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून गौणखनिजची वाहतूक करताना दिसले.दरम्यान अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करताना ट्रॅक्टर अडविल्याचा राग आल्याने एकाने महसूल पथकाशी हुज्जत घालत, महिला तलाठीच्या कानशिलात लगावल्याची घटना धुळे येथील देवपुरातील नकाणे रोड भागात गुरुवारी रात्री घडली.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टोळी विरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलले असताना बऱ्याचदा महसूल पथक आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो यापूर्वी देखील अनेकदा महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत वाळू माफी्यांचे झाले वाद, अंगावर वाहन चढवीने, धमक्या देणे बाबतच्यां घटना समोर आल्या असतांना आता थेट महिला तलाठीच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून
कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह गौणखनिज असा एकूण २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी नकाणे येथील तिघांविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री महिला तलाठी यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा