Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
पोलिसांनी जप्त केला तब्बल साडेपाच टन बनावट खवा...! लक्झरी चालकासह दोघांना घेतले ताब्यात....!
पोलिसांनी जप्त केला तब्बल साडेपाच टन बनावट खवा...! लक्झरी चालकासह दोघांना घेतले ताब्यात....!
भुसावळ प्रतिनिधी : गुजरात येथून खाजगी लक्झरी बसद्वारे भुसावळात आलेला सुमारे साडेपाच टन बनावट खवा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी दुपारी जप्त केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मिठाईसह बेकरीत बनावट खवा वापरणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान, बनावट खव्याचे अहमदाबाद कनेक्शन समोर आले असून खवा वितरण करणारी एजंटाची मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय आहे. पोलिसांनीच आता पाळेमुळे खोदून संशयीतांना बेड्या ठोकण्याची अपेक्षा आहे.
आधी जळगावात नंतर भुसावळात वितरण : मलकापूरात जाणार होता खवा पोलिसांनी याप्रकरणी लक्झरी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मात्र खवा तपासणीचा अहवाल आल्यानंतर अधिक काही सांगता येईल व नंतरच अधिक कारवाई करता येईल, अशी अंगकाढू भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गुजरातमधील हा खवा हा जळगावातही उतरवण्यात आला व तेथून भुसावळसह मलकापूरमध्ये तो पोहोच केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच माव्याच्या मोदकांना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बनावट खव्याचा वारेमाप करीत अखाद्य खवा ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सज्ज केले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता नाहाटा चौफुलीवर गुजरातमधून आलेल्या एम. के. ट्रॅव्हल्स (जी.जे. 01 ए. टी. 1210) मधून खवा उतरवून तो आयशर (जी.जे.38 टी. ए.1800) मध्ये टाकला जात असताना पथकाने छापेमारी केली. दोन्ही वाहनांवरील चालकांसह वाहने व खवा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आणण्यात आला व मोजणीत तब्बल 176 बॅगमध्ये पाच हजार 340 किलो वजनाचा खवा आढळला.
यांच्या पथकाने केली धाडसी कारवाई या खव्याचे बाजारमूल्य 11 लाख 74 हजार 800 रुपये असल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. ही कारवाई हवालदार सुरज पाटील, हवालदार संदीप चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार अनल चौधरी, नाईक संकेत झांबरे यांच्या पथकाने केली. लक्झरी चालक कन्नू पटेल (37,अहमदाबाद) व आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (35, अहमदाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा